गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

कानांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचेनमुळे वेगाने धावतो चित्ता

जगातील सर्वात वेगाने धावणारा प्राणी म्हणून चित्ता ओळखला जातो. ताशी 104 किलोमीटच्या सर्वोच्च वेगाने चित्ता पळू शकतो. चित्तयाच्या या भन्नाट वेगाचे रहस्य जाणून घेण्याचे शास्त्रज्ञांचे सतत प्रयत्न सुरु आहेत. या दिेशेने प्रयत्नशील असलेल्या अमेरिकी शास्त्रज्ञांनी कानांच्या अतंर्गत भागातील खास प्रकाराच्या रचनेमुळे चित्ता एवढ्या प्रचंड वेगाने धावू शकतो, असा निष्कर्ष काढला आहे. कानाच्या आतील रचनेमुळे चित्ता तोल आणि शरीराची ठेवण सांभाळू शकतो असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यांनी 21 चित्त्यांच्या कवट्यांची हाय रिजॉल्युशन एक्स-रेद्वारे तपासणी केली. त्यात चित्त्याच्या कानाच्या आतील रचनेमध्ये उत्क्रांती होत गेल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले.
 
चित्त्याच्या अन्य 12 प्रजातींवरही संशोधन केले. त्याआधारे चित्त्याच्या कानाच्या आतील रचनेची थ्रीडी व्हर्चुअल प्रतिमा करण्यात आली. या संशोधनाचे प्रमुख जॉन फिल्न यांनी सांगितले की आजच्या काळातील चित्त्याच्या कानाच्या आतील तीन अर्धवर्तुळाकार नलिकांपैकी दोन नलिकांची लांबी जास्त असल्याचे आढळले. त्यामुळे चित्त्याला शिकारीवेळी नजर स्थिर ठेवून वेगाने धावणे शक्य होते.