शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

हे चमत्कारी उपाय तुम्हाला करून टाकतील मालामाल!

हे चमत्कारी उपाय तुम्हाला करून टाकतील मालामाल
'जादुटोणा' हा शब्द जरी ऐकला तरी चांगल्या- चांगल्यांची बोबडी उडते. यात पशु-पक्षांची बळी दिली जात असल्याने यावर कोणी विश्वास ठेवत नाही. परंतु, तंत्रशास्त्रात अगदी लहान- लहान उपाय करून देखील आपण आपले आयुष्य बदलू शकतो. आपण श्रीमंत व्हावे, असे प्रत्येकाला वाटत असते. धन प्राप्तीसाठी काही खास उपाय... 

1. घरातील प्रमुख महिलेने दररोज पहाटे उठून नित्यकर्म आटोपून तांबे धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. घरातील दारिद्रय नष्ट होऊन घरात भरभराटी येते.

2. बुधवार हा लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे. या दिवशी कोणालाही उधार, उसनवारीत पैसे देऊ नये. ते परत मिळण्याची शक्यता कमीच असते.

3. प्रत्येक अमावस्येला शुभ मुहूर्तावर लक्ष्मीचे पूजन करावे. घरात बरकत राहते.

4. गुरुवारी तुम्हाला अपेक्षित धनलाभ झाल्यास त्यातील 15, 30, 45 अथवा 60 रुपये काढून ते एका पाकिटात ठेऊन एका मंदिरात ठेवावे.

5- दुकान अथवा घरातून बाहेर पडताना खाली खिशाने निघू नका.

6- जर तुम्हाला कोणाचे कर्ज चुकवायचे असेल तर ते मंगळवारचा दिवस पाहून चुकवावे. असे केल्याने कर्ज लवकर फेडले जाते.