धूमकेतू म्हणजे काय, गुपित जाणून घ्या
अंतराळात दोन प्रकाराचे पिंड फिरत आहे. एक उल्कापिंड आणि दुसरा धूमकेतू. धूमकेतूला पुच्छल तारा (टेलस्टार) देखील म्हणतात. या ताराच्या मागे एक जळत असलेली शेपटी देखील दिसते. म्हणून ह्याला शेपटीचा (पुच्छल तारा) असेही म्हणतात. उल्कापिंडापेक्षा धूमकेतू तीव्र गतीने फिरतात. आपल्या सौरमंडळाच्या शेवटी कोट्यवधीने धूमकेतू सूर्याचा अवती भवती फिरत आहे.
धूमकेतूचे चार भाग आहेत. पहिला न्यूक्लियस-बर्फ, गॅस आणि धूळ या मिश्रणाने बनले आहे. दुसरे हायड्रोजनचे ढग, तिसरे धुळीचे गुबार, चवथा कोमा- पाणी, कार्बनडाय ऑक्साइड आणि इतर गॅसच्या मिश्रणाने बनलेले दाट ढगांचे गट आहे. पाचवे आयनटेल- सूर्याच्या संपर्कामध्ये आल्यावरच तयार होते. ही शेपटी प्लाझ्मा आणि किरणांनी भरलेली असते.
धूमकेतूला सूर्याभोवती परिक्रमा करण्यासाठी हजारो आणि लक्षावधी वर्षे लागतात. काही धूमकेतू असे असतात ज्यांना शेकडो किंवा 100 शंभर वर्षे लागतात. काही काही धूमकेतूंचा आकार काही किलोमीटरच्या पिंडांच्या बरोबरीचे असतात. तर काही चंद्रमा एवढ्या आकाराचे असतात. ज्या वेळी हे धूमकेतू फिरत फिरत सूर्याचा अगदी जवळ येतात, तेव्हा ते फार तापतात आणि गॅस आणि धूळ पसरवतात. जेणे करून पृथ्वीच्या सम ग्रहांसारखे दिसणाऱ्या मोठे चमकणारे पिंड तयार होतात.
धूमकेतू ज्यावेळी सूर्याचा जवळ असतात तेव्हा ते जळायला लागतात. यांचे डोके एका चमकणाऱ्या तारांप्रमाणे दिसतात, आणि शेपटी अती चमकत आणि जळत असल्याप्रमाणे दिसते. डोकं याचे केंद्रक म्हणजे केंद्र असतं. ज्यावेळी हे सूर्यापासून लांब जातात त्यावेळी हे परत आपल्या ठोस रूप घेऊन धूळ आणि बर्फ केंद्रामध्ये गोठून जातात. ज्या मुळे याची शेपटी लहान होते किंवा शेपटी नाहीशी होते.
असे म्हणतात की 6.5 कोटी वर्षांआधी पृथ्वीवरून डायनासोर सह 70 टक्के प्राणी नष्ट करणारे आकाशीय उल्कापिंड नव्हे तर धूमकेतू असे. हे पृथ्वी वर धडकल्यावर सर्व प्राणांचा नायनाट झाला.
प्रत्येक धूमकेतूच्या परतण्याची ठरावीक काळवेळ असते. सर्वात प्रख्यात हैलीचे धूमकेतू शेवटी 1986 वर्षी दिसले होते. पुढील धूमकेतू 1986+76 = 2062 मध्ये दिसून येणार. हैली धूमकेतूची परिभ्रमण कालावधी 76 वर्षी असते. ज्यांचा जन्म 1970 किंवा 71 किंवा या आधी झालेले आहे, त्यांनी या धूमकेतूला बघितले आहे. धूमकेतूचे नाव त्यांचा शोधकर्त्यांच्या नावावर ठेवले जाते. जसे की हैली या धूमकेतूचे नाव खगोलशास्त्रज्ञ एडमंड हैली यांच्या नावावर ठेवले आहे.
स्रोत : एजन्सी