सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 28 ऑक्टोबर 2019 (10:10 IST)

पाकिस्तानचा नरेंद्र मोदींसाठी हवाई हद्द देण्यास नकार

पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हवाईमार्ग नाकारला आहे. मोदींच्या सौदी अरेबिया दौऱ्यासाठी भारतानं पाकिस्तानकडे हवाई हद्द वापरण्याची परवानगी मागितली होती. मात्र, पाकिस्ताननं नकार दिला आहे.  
 
भारताकडून जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं कारण देत पाकिस्ताननं ही परवानगी नाकारलीय. परराष्ट्र मंत्र्यांनी हे कारण दिल्याचं पाकिस्तानी रेडिओनं सांगितलं.
 
काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 भारतानं रद्द केल्यानंतर पाकिस्ताननं भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे.
 
याआधी न्यूयॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विशेष विमानाला पाकिस्ताननं हवाई हद्दीचा वापर करण्यास मनाई केली होती.