1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified शुक्रवार, 2 जुलै 2021 (09:10 IST)

Hypnotism हिप्नॉटिझमचे फायदे आणि तोटे

कृत्रिम निद्रा असणार्‍या अवस्थेत एक तरुण स्त्री सम्मोहनकर्त्यासमोर बसली होती. संमोहन शास्त्रज्ञ तिला गंभीर स्वरात सूचना देत होता. त्याने पेन्सिलच्या टोकावर रबर लावला आणि तो अंगार असल्यासारखं जळत असल्याचे सांगितले. तो अंगारप्रमाणे लाल आहे. त्यानंतर संमोहन शास्त्रज्ञाने त्या पेन्सिलला जोडलेल्या रबरला त्या युवतीच्या हाताला स्पर्श केला. मुलगी फक्त किंचाळलीच नाही तर थोड्या वेळाने तिथे एक फोडही आला.
 
संमोहनचा हा एक प्रयोग दर्शवितो की हे जग आणि आपला 'जीव' मनाच्या सामर्थ्याने नियंत्रित आहे. हे एक उदाहरण देखील कल्पनाशक्ती, विचार आणि भावना किती महत्त्वपूर्ण आहे हे दर्शवते. या प्रयोगांनी असा निष्कर्ष काढला आहे की मानसिक उत्तेजनामुळे शारीरिक बदल होऊ शकतात. अशा परिस्थितीत संमोहन करण्याचे खालील फायदे होऊ शकतात-
 
1. कोणताही शारीरिक रोग काही प्रमाणात बरा होऊ शकतो.
2. कोणताही मानसिक आजार बराच प्रमाणात बरा होतो.
3. याद्वारे कोणत्याही प्रकारची भीती किंवा फोबिया दूर केला जाऊ शकतो.
4. या माध्यमातून व्यक्तीचा विकास करून यश मिळवता येते.
5. संमोहनद्वारे दूर बसलेल्या कोणत्याही व्यक्तीची स्थिती जाणून घेता येते. 
6. याद्वारे, ते शरीरातून बाहेर निघून हवेमध्ये फिरता येतं.
7. याद्वारे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानातील घटना जाणून घेता येतात.
8. याद्वारे मागील जन्माबद्दल जाणून घेता येऊ शकतं.
9. याद्वारे एखाद्याचे प्राण वाचवले जाऊ शकतात.
10. याद्वारे लोकांचं दुख:वेदना दूर करता येतात.
11. याद्वारे एखादी व्यक्ती स्वतःच्या वाईट सवयीपासून मुक्त होऊ शकते .
12. याद्वारे भरपूर आत्मविश्वास आणि निर्भयता प्राप्त केली जाऊ शकते.
 
संमोहन करण्याचे फायदे आणि तोटे देखील आहेत. चला तोटे जाणून घ्या
 
1. डोकेदुखी
2. डोळ्यांना नुकसान
3. अनिद्रा
4. मानसिक विचलन
5. भ्रम आणि स्मृति दोष
 
1. आत्म संमोहन किंवा एक्सपर्टकडून संमोहित होण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. संमोहनाचा चेतन मनावर खूप प्रभाव पडतो. चेतन मन अवचेतन मनाचा गुलाम असतं. अवचेतन मन जे सल्ला-निर्देश देतं चेतन मन त्यालाच सत्य मानतं मग ते तार्किकदृष्ट्या चुकीचं असलं तरी. म्हणून आत्म संमोहनपूर्वी सकारात्मक विचारांचे शिक्षण घेणे गरजेचं आहे किंवा सकारात्मक भाव आणि विचार जागृत करणार्‍या पुस्तक वाचायला हव्या आणि त्यांच्या दिशा-निर्देशांचे पालन केले पाहिजे.
 
2. एखाद्या व्यक्तीस त्याच्या मानसिक आजाराचे निदान करण्यासाठी एखाद्या प्रशिक्षित संमोहनजनाऐवजी अनाड़ी संमोहनकर्त्याद्वारे संमोहन केले असल्यास, तो काय सल्ला किंवा दिशा देईल याची शाश्वती नाही. संमोहन रोगाचे मनोवैज्ञानिक ज्ञान नसलेले संमोहनशास्त्रज्ञ संमोहन व्यक्तीस अशा सूचना देऊ शकतात, जे नंतर त्याला हानिकारक ठरतील. प्रशिक्षित संमोहन विशेषज्ञ संमोहन व्यक्तीच्या समस्या सोडविण्याचा आणि त्याचे व्यक्तिमत्त्व योग्यरित्या विकसित करण्याचा प्रयत्न करते. तो संमोहित व्यक्तीचे मानसिक परिणाम लक्षात घेऊन प्रत्येक शब्द आणि वाक्य काळजीपूर्वक वापरतो.
 
3. आत्म सम्मोहन करणे किंवा दुसर्‍याकडून संमोहित होणे किंवा दुसर्‍याला संमोहित करणे यात धोका आहे. योग्य पद्धतीने हे कार्य पार पडले नाही तर तर ती व्यक्ती मानसिक आजाराचा बळीही बनू शकते.
 
4. संमोहन म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते? यामध्ये अवचेतन मनाची भूमिका काय आहे हे आपल्याला ठाऊक नसल्यास आणि त्याच्या परिणामाबद्दल आपल्याला माहिती नसल्यास, आत्म-संमोहन देखील आपल्यासाठी धोका ठरू शकतो. यामुळे आपल्याला निद्रानाश देखील होऊ शकते.
 
5. संमोहन विद्या आपल्याला वेडे बनवू शकते. एखाद्या योग्य शिक्षकाकडून ते योग्यरित्या न शिकल्यास किंवा समजले नसल्यास याचे अनेक धोके आहेत जे आमच्या मन आणि सूक्ष्म शरीराशी निगडित आहे.