सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

Astro Tips : कर्जात बुडाले आहात, मग हा उपाय करा!

ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धी, वाणी आणि धनासाठी कारक ग्रह मानले जाते. लाल किताबनुसार बुध हा अन्य ग्रहांच्या शुभ-अशुभ फळाचा सुचक ग्रह आहे. बुध शेअर आणि वायदा बाजारात इच्छीत फळ मिळवून देणारा ग्रह आहे. बुध ग्रह हा पृथ्वीचा राशी स्वामी असल्याने भूगर्भिय हलचालींनाही प्रभावित करीत असतो.

उधारी आणि कर्जापासून सुटका करण्यासाठीचे उपाय:

मेष- घोड्याला हिरवा चारा खाऊ घाला अथवा आजारी व्यक्तीला औषधी दान करा.

वृषभ- विद्यार्थ्यांना अभ्यासाचे साहित्य दान करावे.

मिथुन- झाडांना पाणी घालावे व पोपटाला हिरवी मिरची खाऊ घाला.

कर्क- 10 वर्षांपेक्षा लहान बालिकेला मिष्ठान्न खाऊ घालून तिला भेटवस्तु द्यावी.

सिंह- तृतियपंथीला हिरव्या बांगड्या दान करावे.

कन्या- गाईला हिरवे मूंग खाऊ घालून हिरवे वस्त्र परिधान करावे.

तुळ- गरजुंना हिरवे वस्त्र दान करावे.

वृश्चिक- कुलस्वामिनीपुढे कांस्याचा दिवा लावावा.

धनु- आपल्या जोडीदाराला दागिणे अथवा पन्ना रत्न भेट द्यावा.

मकर- कोणाला मदत करा अथवा त्याला मदत मिळवून देण्यासाठी मदत करा.

कुंभ- वयोवुध्द व्यक्तीस हिरवे वस्त्र दान करा.

मीन- श्री.गणेश पूजन करून दूर्वा अर्पण करा.