शनिवार, 3 डिसेंबर 2022
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (09:08 IST)

लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अमलात आणा या 4 टिप्स

पैसा सर्व काही नसला तरी तो काहीच नाही असे ही म्हणता येत नाही. सर्वांना पैशाची गरज असते. प्रत्येक माणूस असाच विचार करतो की रात्रभरात असे काही झाले पाहिजे की तिजोरी भरून जायला पाहिजे. लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी हे उपाय केले तर नक्कीच तुमचे सितारे बदलू शकतात.  
 
आजकाल जास्तकरून सेलेरी एकाउंटमध्ये जमा होते. लोक संपूर्ण सेलेरी काढण्यापेक्षा काही काही पैसेच काढतात. असे म्हटले जाते की लक्ष्मीला घरात आणले नाही तर तिचा अपमान झाल्यासारखा असतो. अशात जेव्हाही तुमची सेलेरी होईल तेव्हा संपूर्ण पगार घरी आणून पूजेच्या स्थानी ठेवायला पाहिजे. नंतर बँकेत परत जमा करू शकता.  
नोटांना कधीही मोडून नठेवता व्यवस्थित ठेवायला पाहिजे. आई वडिल किंवा मोठ्याकडून आशीर्वादाच्या स्वरूपात मिळालेल्या नोटांवर हळद किंवा केशराचा टिका लावून आपल्याजवळ ठेवायला पाहिजे. आपल्या पर्समध्ये बसलेल्या लक्ष्मीचे फोटो ठेवायला पाहिजे. वास्तुशास्त्रात म्हटले जाते की पर्समध्ये नेहमी पिंपळाचे पान ठेवायला पाहिजे.  
 
घर किंवा प्रतिष्ठानात तिजोरी असेल तर त्यात एक नारळ घेऊन त्याला एका स्वच्छ कपड्यात बांधून ठेवल्याने धनवृद्धी होते. शनिवारी घराची स्वच्छता केल्याने लक्ष्मीचे घरात आगमन होते. रोज काहीनं काही दान करण्याची सवय बनवायला पाहिजे. असे केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते.  
 
दिव्यात लाल दोरा घालून लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. दोर्‍याचा लाल रंग लक्ष्मीचा प्रिय मानला जातो. पूजा करताना पांढर्‍या रंगाच्या मिठाईचा प्रसाद दाखवल्याने लक्ष्मी प्रसन्न होते.