सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

Food must be avoided on saturdays शनिवारी काय खाऊ नये?

Mango Pickle
Food must be avoided on Saturdays शनिवारी शनी देवाची पूजा केली जाते. या दिवशी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पित केल्याने त्यांची कृपा दृष्टी राहते असे म्हणतात. तरी या व्यतिरिक्त शनिवारी काही उपाय केले पाहिजेत ज्यांनी शनी देवाचा कोप होत नाही. या दिवशी काही पदार्थांचे सेवन आवर्जून टाळाले पाहिजे-  
 
* शनिवार कैरीचे लोणचे खाऊ नये. हे आबंट असल्यामुळे खाणे टाळावे. खरं तर शनिवारी कोणतेही आंबट पदार्थ खाणे टाळावे.
* शनिवारी लाल तिखट खाणे टाळावे कारण याला मंगळ आणि सूर्य ग्रहाचे प्रतीक मानले गेले आहे. दोन्ही शनी विरोधी आहे. अशात या दिवशी लाल तिखट खाल्लयाने शनीचा प्रकोप झेलावा लागू शकतो.
* शनिवारी चणा, उडीद, मूग आणि मसूर डाळ खाणे देखील टाळावे. कारण हे सर्व मंगळ ग्रहाचा प्रभाव दर्शवतात. याचे सेवन केल्याने सुरळीत होणारे कामांमध्ये देखील अडथळे निर्माण होऊ शकतात.
* शनिवारी दारुचे सेवन करु नये. दारु राक्षसांचे पेय मानले गेले आहे. दारु प्यायल्याने बुद्धी भ्रष्ट आणि भ्रमित होते. याने शनी देव नाराज होतात. दारुचे सेवन केल्याने मान-सन्मान मिळत नाही आणि जीवाचा धोका देखील वाढतो.
* शनिवारी दूध किंवा दह्याचे सेवन करु नये. हे चंद्राचे प्रतीक आहे. याचे सेवन केल्याने शनी देव नाराज होऊ शकतात. याने मानसिक त्रास झेलावा लागू शकतो. तरी दही सेवन करायचे असेल तर त्यात धणेपूड, पुदीना, गुळ किंवा केशर मिसळून सेवन करावे.
* शनिवारी मासाहारी भोजन करु नये. याने शनी देवाचा क्रोध वाढू शकतो. याने व्यक्ती वाईट संगतीत अडकू शकतो. यासोबतच धनाचा नाशही होऊ शकतो.
* शनिवारी पिवळ्या रंगाचे पदार्थ खाऊ नये. कारण हे बृहस्पति देवाचे अन्न मानले जाते आणि शनि आणि गुरुमध्ये सुसंगत नसल्याने माणसाच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात.