1. धर्म
  2. नवरात्र 2023
  3. नवरात्र संस्कृति
Written By
Last Modified: बुधवार, 18 ऑक्टोबर 2023 (20:01 IST)

Navratri Totke: नवरात्रीमध्ये काळ्या तिळाचे करा उपाय, ग्रह दोष दूर होतील

navratri
Navratri Totke: शारदीय नवरात्रीची सुरुवात झाली आहे आणि 23 ऑक्टोबर 2023 रोजी समाप्त होईल. नवरात्रीचा हा काळ केवळ दुर्गादेवीच्या उपासनेसाठीच खास नसून जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठीही महत्त्वाचा आहे. ज्योतिष आणि लाल किताबात नवरात्रीसाठी उपाय आणि युक्त्या सांगण्यात आल्या आहेत. या टिप्स आणि उपाय कुंडलीतील अनेक प्रकारच्या ग्रह दोषांपासून मुक्ती देतात जसे की शनी दोष, काल सर्प दोष, राहू-केतू दोष इ. आज आपण नवरात्रीत काळ्या तिळाच्या अशा उपायांबद्दल जाणून घेऊया, जे खूप फायदेशीर ठरतात. काळ्या तिळाच्या या उपायांनी घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदेल आणि प्रगतीचे नवे मार्गही उघडतील.
 
काळ्या तिळाचे उपाय
काळ्या तिळाचे उपाय नोकरी आणि व्यवसायातील अडचणी दूर करतात. तसेच प्रगती आणि संपत्ती देते.
 
- नवरात्रीच्या काळात पाण्यात काळे तीळ मिसळून सोमवार आणि शनिवारी शिवलिंगावर अर्पण करावे. असे केल्याने कुंडलीतील कालसर्प दोष, राहू, केतू आणि शनी दोष यांचा प्रभाव कमी होतो. अडथळे दूर होतात. कामं होऊ लागतात. घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते.
 
- नवरात्रीत येणाऱ्या शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यात थोडे काळे तीळ टाका, असे केल्याने शनीची साडेसाती आणि धैयाच्या त्रासापासून आराम मिळतो.
 
- नवरात्रीमध्ये संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे विवाह, नोकरी, व्यवसायातील अडथळे दूर होतील. आयुष्यात पुढे जाण्याचे मार्ग खुले होतील.
 
- नवरात्रीच्या काळात शनिवारी काळे तीळ आणि काळे उडीद काळ्या कपड्यात बांधावे. मग हे बंडल एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा. नवरात्रीपासून अखंड 11 शनिवार असे करा. यामुळे तुमचे आर्थिक संकट दूर होईल. कर्ज संपेल. पैशाची आवक होण्याचे मार्ग खुले होतील. करिअर आणि व्यवसायात वेगाने प्रगती होईल.