गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 (09:08 IST)

रोहयाचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज देवघटी बसले..!नवरात्रोत्सव प्रारंभ

Dhavir maharaj
social media
रोहा । देशात ज्या दोन देवस्थानांना पोलिस मानवंदना देण्याची प्रथा, परंपरा ब्रिटीश काळापासुन सुरू आहे त्यापैकी एक असलेले रायगड वासियांचे श्रध्दास्थान आणि रोहयाचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज  मंगलमय वातावरणात विधिवत देवघटी बसले आणी महाराजांच्या नवरात्रोत्सवास मोठया उत्सात प्रारंभ झाले.
 
रोहा शहराच्या पश्चिम बाजुला हनुमान टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या सुंदर आणि भव्य मंदिरामध्ये गाभार्‍यात श्री धाविर महाराज, कालिका माता, बहिरीबुवा वाघबाप्पा मागे तीन वीरा यांचे स्थान आहे. व मंदिराबाहेर महाराजांचा अंगरक्षक चेडा देवाचे स्थान आहे.

हे धाविर महाराजा समस्त रोहावासिय ग्रामस्थांनी श्रध्देने आणि पारंपारीक पध्दतीने तुझा नवरात्रोत्सव मांडला आहे, या उत्सवामध्ये आमच्या हातुन चांगली सेवा होईल.. काही चुका सुध्दा होतील,
 
पण महाराजा हा उत्सव गोड मानून घे तुझ्या गावाला संकटापासून दूर ठेव असे देवस्थानचे पुजारी वालेकर यांनी श्री धाविर देवस्थानचे विश्वस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते आणी शेकडो धाविरभक्तांच्या उपस्थितीत देवाकडे गारहाणे मांडले आणी अक्षतांची उधळण देवावर होत ग्रामदैवत श्री धाविर महाराजांच्या उत्सवास मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. यावेळी गोंधळयांची आरती, विविध वाद्य आणि घंटानादाने आसंमंत दुमदुमून टाकणार्‍यां मंगलमय वातावरणात ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली.
 
यावेळी मंदिरात विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष मयुर पायगुडे, माजी नगराध्यक्ष लालताप्रसाद कुशवाह, समीर शेडगे, विश्वस्त नितिन परब व उत्सव समितीचे इतर पदाधिकारी आणि प्रमुख मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार अनिल तटकरे आणि संदीप तटकरे यांनी मंदिरात उपस्थिती लावून महाराजांचे दर्शन घेतले.
 
Edited By - Ratnadeep ranshoor