सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 (08:56 IST)

सांगली :बिबटया सद्रुश्य प्राण्याने तीन शेळ्या फाडल्या; वनविभागावर नागरिकांचा रोष

leopard
सांगली भिलवडी चोपडेवाडी ( ता. पलूस ) येथे बिबटया सद्रुश्य प्राण्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यातील हि पाचवी घटना असून या बाबत वनविभाग कोणतेही ठोस पाउल उचलत नसल्याने परिसरातील शेतकऱ्याकडून रोष व्यक्त होत आहे.
 
चोपडेवाडीत नागरी वस्तीत राहणारे शहाजी माहदेव माने यांच्या घऱामागे गोठा आहे. तिथून त्यांची शेती सुरू होते. त्यांच्या रात्री शहाजी माने यांनी तीन शेळ्या गोठ्यामध्ये बांधल्या होत्य़ा. सकाळी उठल्यावर शेऴ्यावर बिबट्याने हल्ला करून तीनही शेळ्या ठार केल्याचे निदर्शनास आले. तीन शेळ्या मृत्युमुखी पडल्याने शहाजी माने यांचे साधारण 30 हजारांचे नुकसान झाले आहे.
 
यापुर्वीही चोपडेवाडीतील मोहन गोविंद माने यांच्या पाच शेळ्यांवर, माणिक महादेव माने, सतिश माने आणि दिवाणजी माने यांच्या प्रत्येकी 1 अशा शेळ्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे. गेल्या दोन महिन्यातील ही पाचवी घटना असून यामुळे येथील शेतकरी व ग्रामस्थांच्यात मोठी घबराट पसरली आहे.

पण तरीही वन विभागाकडून कोणतीही ठोस पाऊले उचलली गेली नाहीत. वन विभागाच्या या कारभारामुळे ग्रामस्थांच्यात वन विभागा बाबत तिव्र नाराजीचा सुर उमठू लागला आहे. चोपडेवाडी येथील ग्रामस्थ मृत्यु झालेल्या शेळ्या घेऊन जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे जाण्याच्या तयारीत आहेत. तसेच वनविभागाने याबाबत गांभीर्याने घ्यावे नाहीतर रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे .
 
Edited By - Ratnadeep ranshoor