बुधवार, 29 नोव्हेंबर 2023
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

नावाच्या पहिल्या अक्षराने जाणून घ्या स्त्री किंवा पुरुषाची राशी आणि खास गोष्टी

मेष राशी 
मेष राशी - चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ.  
राशी स्वरूप - मेंढा सारखा, राशी स्वामी मंगळ, अग्नी तत्त्व उग्र स्वभाव, अल्प संतती असणारा.  
मित्र राशी - सिंह, तूळ आणि धनू ह्या यांच्या मित्र राश्या असतात.  
शत्रू राशी - मिथुन, कन्या राशी.  
राशी रत्न - पोवळे
अनुकूल रंग - लाल, पिवळा, गेरू.  
शुभ दिन - मंगळवार, रविवार, गुरुवार.  
अनुकूल देवता - महादेव, भैरव, मारुती.  
अनुकूल ग्रह - सूर्य, गुरु, चंद्र.  
व्रत उपवास - मंगळवार
अनुकूल अंक - 9
अनुकूल तारखा - 9,18, 27.  
सकारात्मक तथ्य - कुटुंबाला पाळणारा, आव्हान स्वीकार करणारा, नेहमी क्रियाशील.  
नकारात्मक तथ्य - दंभी 
दिशा - पूर्व 
या राशीच्या लोकांची प्रकृती - मेष राशीच्या व्यक्ती तापट, कर्तबगार, व्यावहारिक दृष्टीकोण ठेवणार्या, धीट, महत्त्वाकांक्षी, कोणत्याही समस्येला बुद्धीने तोंड देणाऱ्या अशा असतात. स्वतंत्र वृत्तीचा स्वभाव, कर्तबगारी यामुळे या राशीच्या व्यक्तींचा दैवापेक्षा प्रयत्नावर अधिक विश्वास असतो. हे अरसिक, रुक्ष,कठोर, खोटी स्तुती न करणारे, आग्रह न करणारे असे असतात. कालपुरुषाच्या मस्तकावर या राशीचा अंमल असल्याने या राशीच्या लोकांना सहसा मेंदूशी संबंधीत त्रास जसे दाह, मस्तकशूळ वगैरे तसेच चेहऱ्याचा पक्षाघात, नेत्रदोष, कर्णदोष, रक्तदाब वाढणे असे विकार होतात.

मेष राशीच्या स्वभावानुसार यांच्यात नेतृत्व करण्याचे गुण असल्यामुळे राजकारणी, सैन्य अधिकारी, पोलीस
विभागातील अधिकारी जर या राशीचे असले तर ते जास्त यशस्वी होतात.
वृषभ राशी
वृषभ राशी - ओ औ इ उ ए ऐ वा व वीवि वु वू वे वं ई ऊ
राशी स्वरूप - बैल समान, राशी स्वामी - शुक्र, भूमी तत्त्व, रजो गुणी, दृढ शरीर. 
मित्र राशी - कुंभ व मकर 
शत्रू राशी - सिंह, धनू आणि मीन 
राशी प्रकृती व स्वभाव - जास्तकरून सौम्य स्वभाव असणारे असतात. 
राशी रत्न - हिरा
अनुकूल रंग - पांढरा आणि निळा
शुभ दिवस - शुक्रवार, शनिवार व बुधवार 
अनुकूल देवता - लक्ष्मी आणि सरस्वती देवी 
व्रत उपास - शुक्रवार 
अनुकूल अंक - 6 
अनुकूल तारखा - 6, 15, 24 
सकारात्मक तथ्य - गुरू भक्त, कृतग्य, मायाळू 
नकारात्मक तथ्य - दुराग्रही, आळसी 
दिशा - दक्षिण 
या राशीच्या लोकांची प्रकृती - ही रास कष्टाळूपणा, सोशीकपणा, सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवते. ही सम राशी आहे. कुंडलीतील समस्थानात सम राशी सामान्यत: बलवान असते असे
मानले जाते. ही स्थिर आणि पृथ्वी तत्त्वाची राशी आहे. तसेच ही चतुष्पाद राशी आहे. चतुष्पाद राशी दशम भावात बलवान असतात. ही पृष्ठोदय राशी आणि रात्रीबली राशी आहे. ही मध्यम प्रसव आहे.
 
वृषभ ही रास चंद्राची रास आहे. या राशीच्या व्यक्ती तेजस्वी, बुद्धिमान असतात. लोकांना आपलेसे करणारी ही रास आहे.
मिथुन राशी 
मिथुन राशी - क कृ का कि की कु कू घघृ घा ड छ छा के कौ ह हा ह्
राशी स्वरूप - स्त्री पुरुष आलिंगनबद्ध, राशी स्वामी - बुध, वायू तत्त्व - तमो गुणी, मध्यम कामी. 
मित्र राशी  - तूळ, सिंह, कन्या, कुंभ
शत्रू राशी  - कर्क, वृष, मेष 
प्रकृती - क्रूर स्वभाव
राशी रत्न - पाचू
अनुकूल रंग - हिरवा
शुभ दिन - बुधवार
अनुकूल देवता - गणपती, सरस्वती, दुर्गा 
व्रत उपास - बुधवार 
अनुकूल अंक - 5
अनुकूल तारखा - 5, 14, 23 
व्यक्तित्व - चतुर, निडर, बुद्धिमान
सकारात्मक तथ्य - कुशल व्यापारी, वाक्पटू 
नकारात्मक तथ्य - आत्मकेंद्रित, निष्ठुर
दिशा - पश्चिम 
या राशीच्या लोकांची प्रकृती :  ही वायुतत्वाची रास आहे. या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासू वृत्ती, तरल बुद्धी, हास्य विनोदी, खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती हे दोन
महत्त्वाचे गूण या राशीत आढळतात.
कर्क राशी 
कर्क राशी -  हि हि हु हू हे हो डडा डि डी ड् डू डे डो डॉ
राशी स्वरूप - केकडा, राशी स्वामी - चंद्र, जल तत्व, उग्र स्वभाव, अल्प संतती
मित्र राशी - वृश्चिक, मीन, तूळ
शत्रू राशी - मेष, सिंह, धनू, मिथुन, मकर व कुंभ
अनुकूल रत्न - मोती, मूंगा
अनुकूल रंग - पांढरा, क्रीम
शुभ दिन - सोमवार, मंगळवार, गुरुवार
अनुकूल देवता - महादेव, गौरी 
व्रत उपास - सोमवार, गुरुवार 
अनुकूल अंक - 2 
अनुकूल तारखा - 2, 11, 20, 29 
व्यक्तित्व - अध्ययनप्रिय, जलप्रिय, भावुक, कुशल प्रबंधक 
सकारात्मक तथ्य - कल्पनाशील, योजना आखणारा, वफादार 
नकारात्मक तथ्य - नेहमी कुठला तरी रोग, आळस 
दिशा - उत्तर 
या राशीच्या लोकांची प्रकृती - कर्क राशीचा जलप्रदेश, समुद्र, नदी किंवा समुद्र किनारा यांचा जवळचा संबंध
मानला जातो. कर्क रास पृष्ठोदयी आहे. उत्तर दिशेकडे विशेष बलवान असते. साधारणपणे ही रास चंचल, कोमल, सौम्य पण अस्थिर स्वभावाची दिसून येते. ही रास रजोगुणी, जलतत्त्वयुक्त आहे. तसेच रात्री बलवान असणारी, कफ प्रकृतीची, स्त्री प्रधान आणि बहुसंततीयुक्त आहे. या राशीचे गुण म्हणजे चिवटपणा, लज्जा आणि विवेक.
सिंह राशी 
सिंह राशी -  म मृ मा मि मी मू मेमो ट टा ट्र टि टी ट्री टे ट्रे टै टौ ट्रा
राशी स्वरूप - सिंहा सारखा, स्वामी - सूर्य, अग्नितत्त्व,  
मित्र राशी - मिथुन, कन्या, मेष, धनू 
शत्रू राशी- वृषभ, तूळ, मकर, कुंभ 
अनुकूल रत्न - माणिक्य, मूंगा 
अनुकूल रंग - चमकदार, पांढरा, पिवळा, भगवा 
शुभ दिन - रविवार, बुधवार 
अनुकूल देवता - सूर्य 
व्रत उपास - रविवार
अनुकूल रंग - 1
अनुकूल तारखा - 1,10,19,28 
व्यक्तित्व - प्रबळ पराक्रमी, महत्त्वाकांक्षी, अधिकारप्रियता 
सकारात्मक तथ्य - मोकळ्या मनाचा, उदार 
नकारात्मक तथ्य - गर्विष्ठ, अति आत्मविश्वासी, अति महत्त्वाकांक्षी 
दिशा - पूर्व 
या राशीच्या लोकांची प्रकृती - सूर्य व मंगळ हे या राशीचे कारक ग्रह आहेत. ही अग्नितत्त्व, पुरुष राशी आहे.
राशीचा स्वामी सूर्य (ज्योतिष) आहे. यांना अधिकार गाजवणे आवडते. भरपूर स्फूर्ती तत्त्वनिष्ठता आकर्षता, आशावाद असलेली ही राशी आहे. जिद्दीने उभारी घेण्याची हिंमत ठेवतात. मिरवण्याची हौस असते, मान सन्मान आवडतात. ताकद आणि चपळाई भरपूर असते.
कन्या राशी 
कन्या राशी - ढो, टो ट्रो प पा पृ प्रपि प्रि प्री पी पु पू ष ण ठ पे प्रे प्रो
राशी स्वरूप - कन्या,  स्वामी - बुध, भूमी तत्त्व, तमोगुणी, मध्यम कामी, शीत प्रकृती.  
मित्र राशी - मेष, मिथुन, सिंह, तूळ
शत्रू राशी - कर्क 
अनुकूल रत्न - पाचू
अनुकूल रंग - हिरवा
शुभ दिन - बुधवार, रविवार, शुक्रवार
अनुकूल देवता - गणपती, सरस्वती, दुर्गा 
व्रत उपास - बुधवार
अनुकूल अंक - 5 
अनुकूल तारखा - 5, 14, 23 
व्यक्तित्व - दोहरे व्यक्तित्व, विद्वान, आलोचक लेख 
सकारात्मक तथ्य - निरंतर क्रियाशीलता, व्यावहारिक ज्ञान
नकारात्मक तथ्य - दुसर्‍यांचे अवगुण शोधणे, कलह प्रियता, अशुभ चिंतन
या राशीच्या लोकांची प्रकृती : उत्कृष्ट बुद्धिमत्ता संशोधक वृत्ती दिसून येते. वेळी कामाला येणारी अचाट स्मरणशक्ती आढळते. बुद्धिचातुर्य, हजरजबाबीपणा, हास्यविनोद याच्या जोरावर उत्कृष्टलोकप्रियता मिळते. निरीक्षण हातोटी उत्तम. अंतर्मनाचा थांग लागू देत नाहीत. पैशाच्या बाबतीत काटेकोर, दूरचा विचार करणारी असतात. माणसाची उत्तम पारख असते.
तूळ राशी 
तुला राशी -  र रा ऋ री रि रु रू रेरो त ता तृ त्रा ति ती तु तू ते
राशी स्वरूप - तराजू सारखे, राशी स्वामी - शुक्र, वायू तत्त्व, रजोगुणी, अल्प संतती. 
मित्र राशी - मिथुन, कुंभ, मकर, धनू, कर्क
शत्रू राशी - सिंह
राशी रत्न - हिरा
अनुकूल रंग - क्रीम, पांढरा, निळा
शुभ दिन - शुक्रवार 
अनुकूल देवता - लक्ष्मी, दुर्गा 
व्यक्तित्व - खोजी, अन्वेषक, मास्टर माइंड
सकारात्मक तथ्य - आत्मविश्वासी, आकर्षक वाणी
नकारात्मक तथ्य - घमंड, ईर्ष्या 
व्रत उपास - शुक्रवार 
या राशीच्या लोकांची प्रकृती - तूळ रास कुंडली मध्ये ७ आकड्याने दर्शवतात. ही वायू तत्त्व असलेली रास आहे.चित्रा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण, स्वातीचे चारही चरण व विशाखाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही राशी बनते. या व्यक्ती आकर्षक, सुंदर, प्रेमळ, कष्टाळू, सौंदर्यप्रेमी, न्यायप्रिय, आणि नीतिवान असतात.
अंतःकरण जाणून घेण्याची हातोटी दिसून येते.
वृश्चिक राशी 
वृश्चिक राशी - तो न ना नृ नि नी नुनू नो नौ य या यी यू 
राशी स्वरूप - विंचू सारखे, राशी स्वामी - मंगळ, जल तत्त्व, समुद्री यात्रेचे शौकीन, तमोगुणी, शीत प्रकृती, बहुकामी. 
मित्र  राशी  - कर्क व मीन 
शत्रू  राशी  - मेष, मिथुन, सिंह, धनू 
अनुकूल रत्न - मूंगा, मोती 
अनुकूल रंग - लाल, पिवळा  
शुभ दिन - मंगळवार, गुरुवार
अनुकूल देवता - महादेव, भैरव, मारुती 
व्रत उपास - मंगळवार
अनुकूल तारखा - 9, 18, 27
व्यक्तित्व - कायदा जाणकार, गणक, समीक्षक 
सकारात्मक तथ्य - बुद्धिमान, निडर, प्रकृती प्रेमी 
नकारात्मक तथ्य - स्वार्थी, ढोंगी, क्रोधी या राशीच्या लोकांची प्रकृती - ही चंद्राची नीच रास आहे. ही रास असणारी माणसे शारीरिक दृष्ट्या चिवट,काटक व स्पष्टवक्ती असतात. त्यांच्यात प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता असते. त्यांना जबरदस्त इच्छाशक्ती असते आणि ती कुटुंबावर अतिशय प्रेम करतात.

धनू राशी 
धनू राशी - ये यो भ भा भे भा भृभृं धृ ध धा धि धी ढा फा फ्र फ्रैं फि फूं फुं
राशी स्वरूप - धनुष उचललेला, राशी स्वामी - गुरु, अग्नी तत्त्व, सतोगुणी, अल्पकामी
मित्र राशी - मेष व सिंह 
शत्रू राशी - कर्क, वृश्चिक आणि मीन
अनुकूल रत्न - पुष्कराज 
शुभ दिन - गुरु 
अनुकूल देवता - विष्णू 
अनुकूल अंक - 3
अनुकूल तारखा - 3,12,30 
व्यक्तित्व - गुणग्राही प्रवृती, अध्ययनप्रियता सकारात्मक तथ्य - बुद्धीवादी, तर्क, लक्ष्य प्राप्तीसाठी तत्पर 
नकारात्मक तथ्य - अतिधूर्तता, अव्यावहारिकता या राशीच्या लोकांची प्रकृती - ही द्विस्वभावी राशी आहे. ही रास असलेल्या माणसाचा स्वभाव काहीसा संतापी, पण याचवेळी संयमी आणि सात्त्विक असतो. माणसात अध्यात्माची ओढ दिसते.
 
तो आशावादी असतो आणि त्याच्यात परोपकारी वृत्ती, दिलदारपणा, न्यायीपण, उदारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते. 
मकर राशी 
मकर राशी - भो ज जा जी ख खा खि खीखे खो खु ग गा ग्र गृ गी ग्रीं गि गं
राशी स्वरूप - मगरी सारखा, राशी स्वामी - शनी, भूमी तत्त्व, वन विहाराचे शौकीन, सौम्य स्वभाव, तमोगुणी, अल्पकामी. 
मित्र राशी - कुंभ 
शत्रू राशी - सिंह आणि धनू 
अनुकूल रत्न - नीलम
अनुकूल रंग - शनिवार
अनुकूल देवता - महादेव, शनी 
व्रत उपास - शनिवार 
अनुकूल अंक - 8 
अनुकूल तारखा - 8, 17, 26 
व्यक्तित्व - परोपकारी, प्रशासक
सकारात्मक तथ्य - जमिनीवर चालणारे, कठोर, परिश्रमी
नकारात्मक तथ्य - संदेहास्पद प्रवृत्ती
या राशीच्या लोकांची प्रकृती -  मकर राशीचे लोक खूप व्यवहारी, धोरणी, महत्त्वाकांक्षी,शिस्तप्रिय, संयमी असे असतात. मकर राशीच्या लोकांना सगळ्या गोष्टींबद्दल थोडीशी निराश वृत्ती असते.
कुंभ राशी 
कुंभ राशी -  गु गू गे ग्रे गो स सृस्त्र सा श श्र श्रे श्री श्री सु सू से सो शो द दू दा
राशी स्वामी - घड्या सारखा, राशी स्वामी - शनी, वायू तत्त्व,  धार्मिक स्थळावर भ्रमणशील, तमोगुणी, मध्यम कामी. 
मित्र राशी - मीन, मिथुन, मकर, वृष व तुला
शत्रू राशी -  कर्क, सिंह, वृश्चिक 
अनुकूल रत्न - हिरा, नीलम 
अनुकूल रंग - निळा, फिरोजी, काळा 
शुभ दिन - शनिवार, शुक्रवार 
अनुकूल देवता - महादेव, शनी 
व्रत उपास - शनिवार, सोमवार 
अनुकूल अंक - 8 
अनुकूल तारखा - 8,17,26 
व्यक्तित्व - योगी, तपस्वी, सत्यखोजी 
सकारात्मक तथ्य - संवदेनशील, कुटुंबप्रेमी, समाजप्रिय 
नकारात्मक तथ्य - निरंतर विचार बदलणे 
या राशीच्या लोकांची प्रकृती - त्यांना प्रिय बोललेले आवडते आणि अप्रिय बोलणे सहन होत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुंभ राशीला सगळ्या गोष्टींची आधीच माहिती असते. कुंभ राशीचे लोक हुशार, मैत्रिपूर्ण, निसर्गप्रिय, प्रामाणिक, स्वावलंबी, नवीन संकल्पना सुचणारी असतात. या राशीला आहारावर नियंत्रण करणे सहज जमते.
मीन राशी 
मीन राशी - दी ची दि दु दू थ थाथ्र झ झं झा झि झी त्र दे द्रे द्रो दो च चा चं
राशी स्वरूप - मासोळी सारखा, स्वामी - वृहस्पती, जल तत्त्व, सौम्य स्वभाव, बहुकामी, सतोगुणी, शीत प्रकृती, बहुसंतती. 
मित्र राशी - कर्क, वृश्चिक
शत्रू राशी - मेष, सिंह, धनू 
अनुकूल रत्न - पुष्कराज 
अनुकूल रंग - पिवळा, लाल, पांढरा 
शुभ दिन - गुरुवार 
अनुकूल देवता - विष्णू 
अनुकूल अंक - 3 
अनुकूल तारखा - 3,12,21, 30 
व्यक्तित्व - भावुक, अध्ययनशील, आध्यात्मिक 
सकारात्मक तथ्य - विनम्रता, सज्जनशीलता 
नकारात्मक तथ्य - बेपर्वा 
या राशीच्या लोकांची प्रकृती - मीन राशीचे लोक सदैव मदतीस तत्पर, संवेदनशील, कल्पक, कधीही नाही न म्हणणारे असे असतात. मीन राशीला व्यवहार जमत नाही. तसेच जास्त वेळी लक्ष देणाऱ्या व्यायाम प्रकारांना ते कंटाळतात. मीन राशीचा खाण्यावर ताबा अजिबात नसतो. पोहता न येणारी मीन राशीची व्यक्ती क्वचित आढळते.