शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : बुधवार, 19 जून 2019 (10:27 IST)

मूलांक 1 : सहज आकर्षण शक्ती असणारा

जन्मदिनांकाची बेरीज म्हणजेच आपला मूलांक योग. जर जन्मदिनांक 19 ऑगस्ट असेल तर, 1+9 =10, 1+0 =10. अर्थात 1. सूर्य हा मूलांक 1चा स्वामी ग्रह. 
 
स्वरूप: मूलांक 1चे स्वरूप सरळ रेषा आहे. सरळ रेषा हे सशक्त आणि सुदृढतेचे प्रतिक. मूलांक 1च्या व्यक्ती शारीरिकदृष्टय़ा सक्षम असतात. सूर्यासारख्या तेजस्वी असतात. सहज आकर्षण शक्ती यांच्यात दिसते. 
 
स्वभाव: व्यावहारिक, मिळूनमिसळून वागणे असा यांचा स्वभाव आहे. पण सगळ्यांशीच ते असं वागत नाहीत. नेहमीच उत्साही असल्याने आजूबाजूचं वातावरणही उत्साही ठेवतात.
 
व्यक्तिमत्त्व : दूरदर्शी आणि सुहृदयी असतात. सार्वजनिक कार्यात मग ते रंगमंच असो वा राजकारण, आपली विशेष छाप सोडण्यात यशस्वी होतात. जितके सामाजिक तितकेच कौटुंबिकही असतात. उच्च विचार, प्रबळ इच्छाशक्ती, कृतज्ञ, दिलेला शब्द पाळणारे आणि नि:स्वार्थीपणे सहाय्य करणारे असे हे व्यक्तिमत्त्व आहे. 
 
गुण: नेतृत्त्व गुण यांना सूर्यानेच प्रदान केलेला आहे. सतत प्रगतीशील असतात. कितीही अडचणींचा सामना करावा लागला तरी पुढे जाण्याचाच सतत विचार करतात. परिणामांचा प्रथम विचार करून मग कृती करतात. 
 
अवगुण: कधी रुक्ष स्वभाव आणि कटु भाषेचा प्रयोग केल्याने या व्यक्ती मैत्रीपूर्ण संबंध आणि शुभचिंतकांना दुरावतात. फार काळ कोणत्याही गोष्टीबाबत गुप्तता राखू शकत नाहीत. निडरपणा हानिकारक ठरतो.
 
भाग्यशाली तिथी: यांच्यासाठी प्रत्येक महिन्यातील 1,2,10,11,19,20,28,29 या तारखा शुभ आहेत. याशिवाय 7,16 आणि 25 या लाभ देणाऱ्या तारखा आहेत. कोणतेही चांगले कार्य, व्यवहार सुरू करावयाचा असल्यास या तारखांना सुरू करणे शुभ ठरेल. यशप्राप्ती होईल. 
 
मैत्री, प्रेम आणि विवाहासाठी भाग्यशाली अंक: ज्या व्यक्तींचा जन्मदिवस 1,2,7,10,11,16,19,20,25,28 आणि 29 असेल त्या व्यक्ती या मूलांकासाठी भाग्यशाली आहेत. यांच्याशी असलेले संबंध दीर्घकाळ टिकून राहतात. या व्यक्तींशी संबंध ठेवल्यास मूलांक 1च्या व्यक्तींना सुखशांती आणि आनंद मिळतो. मूलांक ४ या व्यक्तींसाठी शुभ आहे. 
भाग्यशाली रंग: मूलांक 1 साठी गुलाबी, पिवळा, सोनेरी रंग शुभ आणि यशप्राप्ती देणारे आहेत. तर काळा रंग हानीकारक आहे. मात्र काळ्या रंगाऐवजी गडद राखाडी रंगाचा वापर करू शकता. निळा रंग मानसिक कष्ट देणारा आहे. पांढऱ्या रंगाऐवजी दुधी रंग (क्रीम) लाभदायक ठरेल. 
 
भाग्यशाली वर्ष : या व्यक्तींच्या आयुष्यातील वय वर्षे 7,16,25 शुभ आहेत. शिवाय 10,11,19, 20, 28,29,37, 38,46,47,55,56 हे वर्ष विशेष लाभदायी ठरू शकतात. तर 8,9,41,26,2 7,30,44,45,53 व 54 वे वर्ष समस्या आणि कष्टदायक असू शकते. 
 
भाग्यदायक करिअर: राजकारण, व्यवस्थापन आणि सेनादल ही क्षेत्रं या व्यक्तींसाठी उत्तम आहेत. शिवाय संशोधन, इलेक्ट्रॉनिक्स, क्रीडा, ज्वेलरी या क्षेत्रात करिअर केल्यास यश आणि विशेष लाभ होऊ शकतात.
 
शुभ रत्न: या मूलांकासाठी माणिक रत्न शुभ आहे. ५ कॅरेटपेक्षा अधिक वजनाच्या सोने किंवा तांब्यातील या रत्नास रिंग फिंगरमध्ये धारण करावे. 
 
कल्याणकारी मंत्र: सूर्य मंत्राचा नित्य जप करावा. सूर्यास नियमित जल अर्पण करा. कीर्ती वाढेल. 
मंत्र: ॐ ह्वीं घृणि: सूर्याय आदित्य श्रीं ।