Marathi Biodata Maker
✕

शनि अमावस्या: 4 डिसेंबर 2021 रोजी शनिदेवाला कसे प्रसन्न करावे, 20 छोटे उपाय

Updated: शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (17:40 IST)
 

8. छाया दान: या दिवशी स्टील किंवा लोखंडी भांड्यात मोहरीचं तेल भरून त्यात आपले मुख पाहून संध्याकाळी शनि मंदिरात दान करा. शनिवारी तेल मालिश करावी.
 
9. वृद्धांची सेवा करा : शनिदेवाला वृद्धावस्थेचा स्वामी म्हटले जाते, ज्या घरामध्ये माता-पिता आणि वृद्धांचा आदर होतो त्यांच्यावर शनि देव प्रसन्न होतात आणि ज्या घरामध्ये वृद्धांचा अपमान होतो, त्या घरातून सुख निघून जातं. 

10. कावळ्याला भाकरी खायला द्या: शनिदेवाचं एक वाहन कावळा देखील आहे, शनिदेवाचे वाहन कावळा देखील पूर्वजांचे प्रतीक आहे. या दिवशी कावळ्यांना भाकरी खाऊ घातल्याने शनिदेव प्रसन्न होतात.
 
11. हनुमान पूजा: शनिदेवामुळे उद्भवणाऱ्या गंभीर समस्येसाठी भगवान भोलेनाथ आणि हनुमान जी यांची एकत्र पूजा करावी.
 
12. व्रत: मान्यतेनुसार शनिदोष, साडेसती किंवा ढैय्याने पीडित व्यक्तीने या दिवशी व्रत करून शनिदेवाची पूजा केली तर शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते.
 
13. पिंपळाची पूजा: मान्यतेनुसार शनिदेवाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने शनिदोष संपतो असे म्हणतात.
 
14. शमी पूजा: मान्यतेनुसार शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शमी वृक्षाची पूजा देखील प्रचलित आहे. शनिवारी संध्याकाळी शमीच्या झाडाजवळ दिवा लावणे फायदेशीर ठरेल.
 
15. काळा धागा बांधा: शनि मंदिरातून हातात शनी रक्षा कवच किंवा काळा धागा बांधल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात.
 

16. शनि भोग: शनिदेवाला उडदाची डाळ आणि बुंदीचे लाडू खूप आवडतात, त्यामुळे शनिवारी लाडू अर्पण करून वाटप करावेत.
 
17. तेल दान: शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनि महाराजांच्या मूर्तीला तेल अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात.
 
18. तेल मालिश : शनिवारी संपूर्ण शरीरावर तेलाचा मसाज करून स्नान करावे, यामुळे शनिदोषही दूर होतो.
 
19. पूर्णपणे काळी असलेल्या गायीची पूजा केल्यानंतर तिला 8 बुंदीचे लाडू खाऊ घाला आणि तिची प्रदक्षिणा करा आणि तिच्या शेपटीने आपले डोके 8 वेळा झाडा.
 
20. कुत्र्याला पोळी खायला द्या: काळ्या कुत्र्याला तेल किंवा तूप लावून पोळी खायला द्या.
 
शनि जप : शनि मंदिरात बसून 'ॐ शं शनिश्चराय नम:' जप करावा किंवा शनी चालीसा पाठ करावा.

श्री शनि चालीसा Shri Shani chalisa
 
शनिदेव पूजा मंत्र :
गायत्री मंत्र : 
ओम शनैश्चराय विदमहे सूर्यापुत्राय धीमहि।। तन्नो मंद: प्रचोदयात।।
किंवा... ऊँ भगभवाय विद्महैं मृत्युरुपाय धीमहि तन्नो शनिः प्रचोद्यात्।
किंवा... ऊं कृष्णांगाय विद्महे रविपुत्राय धीमहि तन्न: सौरि: प्रचोदयात।
 
एकाक्षरी मंत्र : मंत्र - ऊँ शं शनैश्चाराय नमः। सामान्य पूजा दरम्यान या मंत्राचा पाठ करावा.
 
शनिदेवाचं तांत्रिक मंत्र : ऊँ प्रां प्रीं प्रौं सः शनये नमः।
 
शनि देव महाराजांचे वैदिक मंत्र : ऊँ शन्नो देवीरभिष्टडआपो भवन्तुपीतये। शनयो रविस्र वन्तुनः।

श्री शनिदेव आरती Shri Shani Aarti
 
शनिदेव पौराणिक मंत्र :
श्री नीलान्जन समाभासं, रवि पुत्रं यमाग्रजम।
छाया मार्तण्ड सम्भूतं, तं नमामि शनैश्चरम।। 
सामान्य पूजा दरम्यान या मंत्राचा जप करावा.

श्री शनैश्चर सहस्रनामावली Shri Shani Sahastra Namavali
 
इतर मंत्र :
ॐ सूर्य पुत्राय नम:।
ॐ मन्दाय नम:।
ॐ हलृं श्री शनैश्‍चराय नम:।
ॐ एं हलृशं शनिदेवाय नम:।
ॐ श्रां श्रीं, श्रूं शनैश्‍चराय नम:।

सर्व पहा

दिवाळीच्या सुट्टीत मुलांना घेऊन कुठे जावे? निसर्ग, किल्ले आणि मनोरंजनाची ठिकाणे

कार्तिक महिन्यात दीपदान का केले जाते? पुराणकथांमधील संदर्भ जाणून घ्या

दिवाळी पार्टी असो वा पूजा, तुमचा सणासुदीचा लूक आकर्षक करण्यासाठी या फॅशन टिप्स अवलंबवा

भाऊबीजेला भावाला काय भेटवस्तू द्यावी? बजेट-फ्रेंडली आणि युनिक गिफ्ट आयडियाज

साडेतीन मुहूर्तांपैकी एक 'दीपावली पाडवा': नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी का मानला जातो शुभ?

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments