श्रीरामाचे हे 5 गुण जीवनात अमलात आणा, यशस्वी व्हा

shriram
Last Modified बुधवार, 21 एप्रिल 2021 (12:48 IST)
प्रभू श्रीरामांनी विपरित परिस्थितीमध्ये देखील धोरण सोडले नाही. त्यांनी वेद व मर्यादा पाळत सुखी राज्याची स्थापना केली. स्वत:च्या भावना आणि सुखांसोबत तडजोड करत न्याय आणि सत्याचे समर्थन केले. मग राज्य त्याग, बाली वध, रावण संहार किंवा सीतेला वन पाठवण्याचा प्रसंग का नसो, त्यांनी धैर्य ठेवून सर्व पार पाडले. त्याच्या जीवनातील 5 गुण अमलात आणून यशस्वी होता येऊ शकतं-
सहनशील व धैर्यवान
सहिष्णुता आणि संयम हा भगवान रामाचा एक विशेष गुण आहे. कैकेयीच्या आदेशानुसार, 14 वर्षे जंगलात घालवणे, समुद्रावर सेतु निर्माणासाठी तपस्या करणे, सीतेचा त्याग केल्यानंतर राजा असून संन्यासी प्रमाणे जीवन व्यतीत करणे हे त्यांच्या सहनशीलता आणि धैर्याचे गुण दर्शवतं.

दयाळू आणि योग्य स्वामी
प्रभू राम यांनी दया दाखवत सर्वांना आपल्या छत्रछायेत जागा दिली. त्यांच्या सेनते पशु़ मानव, दानव सर्व प्रकारे होते त्यांनी सर्वांना पुढे वाढण्याची संधी दिली. सुग्रीवला राज्य, हनुमान, जाम्बवंत व नल-नील यांना देखील त्यांना वेळोवेळी नेतृत्व करण्याचा हक्क दिला. मित्र केवट असो वा सुग्रीव, निषादराज असो वा विभीषण. प्रत्येक जाती, प्रयत्येक वर्गाच्या मित्रांसह प्रभू रामाने ‍हृद्याने नाते जपले. मित्रांसाठी स्वत:ने संकट ओढून घेतले.
उत्तम व्यवस्थापक
भगवान राम केवळ एक कुशल व्यवस्थापक नव्हते, तर सर्वांना सोबत घेऊन जाणार होते. ते प्रत्येकाला विकासाची संधी देत असून उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करत होते. त्यांच्या या गुणांमुळे लंका जाण्यासाठी त्यांनी व त्यांच्या सेनेने दगडांचा पूल तयार केला होता.

आदर्श भाऊ
भगवान रामाचे तीन भाऊ लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न सावत्र आईचे पुत्र होते तरी त्यांनी आपल्या सर्व भावांप्रती सख्खया भावांपेक्षा अधिक त्याग, समर्पण आणि प्रेमाचा भाव ठेवाला. या कारणामुळेच जेव्हा श्रीराम वनवासासाठी निघून गेले तेव्हा लक्ष्मण त्यांच्यासोबत त्यांची सेवा करण्यासाठी गेले आणि रामाच्या अनुपस्थितीमध्ये राजपाट मिळाल्यावर देखील भरताने प्रभू रामाचे मूल्य समजून सिंहासनावर त्यांच्या चरण पादुका ठेवून जनतेला न्याय दिलं.
भरतासाठी आदर्श भाऊ, हनुमानासाठी स्वामी, प्रजेसाठी नीति-कुशल व न्यायप्रिय राजा, सुग्रीव व केवटसाठी परम मित्र आणि सेनासोबत घेऊन चालणार्‍या व्यक्तिमत्व म्हणून रामाला ओळखलं जातं. त्यांच्या या सद्गुणांमुळेच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणून पूजलं जातं. हे देखील खरे आहे की एखाद्याचे गुण आणि कर्म यामुळे त्याची ओळख होते.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

14 जून जागतिक रक्तदानाचे महत्त्व आणि 13 महत्त्वाच्या गोष्टी

14 जून जागतिक रक्तदानाचे महत्त्व आणि 13 महत्त्वाच्या गोष्टी
जागतिक रक्तदान दिन दरवर्षी 14 जून रोजी साजरा केला जातो. बरेच लोक निरोगी असूनही रक्तदान ...

नारळाच्या ग्रेव्हीची भेंडी

नारळाच्या ग्रेव्हीची भेंडी
भेंडीची भाजी बऱ्याच पद्धतीने बनवतात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली भेंडी चव बदलते.आज आम्ही ...

योग्य करिअर कसे निवडावे ,करिअर टिप्स

योग्य करिअर कसे निवडावे ,करिअर टिप्स
सध्या बारावी नंतर आणि महाविद्यालयीन शिकणाऱ्या मुलां समोर हा मोठा प्रश्न असतो.की आता पुढे ...

पोटाचे विकार दूर करण्यासाठी अर्द्धमत्स्येन्द्रासन करावे

पोटाचे विकार दूर करण्यासाठी अर्द्धमत्स्येन्द्रासन करावे
अर्द्धमत्स्येन्द्रासन करण्याची कृती आणि त्याचे फायदे जाणून घेऊ या.

बॉडी स्प्रेच्या नुकसान बद्दल जाणून घ्या

बॉडी स्प्रेच्या नुकसान बद्दल जाणून घ्या
घामाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी लोक शरीरातून येणाऱ्या घामाच्या वासापासून मुक्त ...