Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रजनन प्रक्रीयेत पी.सी.ओ.एस. मुळे संभावतात समस्या

Updated: मंगळवार, 10 मे 2022 (21:08 IST)
पी.सी.ओ.एस.ची लक्षण काय आहे?
पीसीओएसमध्ये अँड्रोजेन (पुरुष हार्मोन्स) च्या अतिरिक्त प्रभावामुळे दुष्परिणाम होतात. जर तुम्ही पीसीओएसने ग्रस्त असाल तर वजन वाढ, अनियमित मासिक पाळी, केसांची वाढ तसेच मुरुमांसारखी लक्षणे तुमच्यामध्ये दिसू लागतात. 
 
अशाप्रकारे, आपण पीसीओएसची कारणे आणि लक्षणे जाणून घेतली. आता आपण पीसीओएस प्रजनन क्षमतेवर कशाप्रकारे परिणाम करू शकतो, याबद्दल जाणून घेऊ. 
 
पी.सी.ओ.एस. आणि वंध्यत्व
पीसीओएसचा प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. पीसीओएसग्रस्त महिलांमध्ये स्त्री बीजाची उत्पत्ती होऊ शकत नाही. गर्भाशयामधील एस्ट्रोजेनच्या अतिउत्पादनामुळे, प्रजननासाठी महत्वपूर्ण असलेले बीजांडच जर नियमित तयार होत नसेल, तर गर्भधारणा अशक्य आहे.  
_ मासिक पाळी अनियमित. 
_ टेस्टोस्टेरॉनसारखे हार्मोन्सची पातळी वाढल्याने अंड्याची गुणवत्ता कमी होते. 
_ इन्सुलिन पातळी प्रतिरोधक समस्यांची वाढ
_ इन्सुलिन वाढीमुळे मधुमेहचा धोका वाढतो. 
 
पी.सी.ओ.एस.च्या या घटकांचा परिणाम जर प्रजननक्षमतेवर होत असेल, तर गर्भधारणा होऊच शकत नाही का?
पी.सी.ओ.एस.ग्रस्त स्त्री आई होऊ शकते का?
गर्भधारणा पी.सी.ओ.एस.मुळे अशक्य जरी असली तरी, काहीप्रमाणात प्रजनन तज्ञाकडून उपचार घेता येतील.
 
पी.सी.ओ.एस. आणि प्रजनन क्षमता उपचार
पीसीओएसवर कोणताही उपचार नाही, परंतु, योग्य काळजी घेतली तर ही समस्या कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, वजन कमी केल्याने काही प्रमाणात पीसीओएसची लक्षणे कमी होऊ शकतात. तसेच, कुटुंब नियोजन आणि अँटी-एंड्रोजनच्या गोळ्या घेतल्याने पीसीओएसच्या लक्षणांमध्ये सुधारणा येऊ शकतात.आपण गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करीत असल्यास, पीसीओएस उपचारातील पहिली पायरी म्हणजे आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणणे, सकस आहार आणि व्यायामाचा त्यात समावेश करणे.
कर्बोदके आणि ग्लायसेमिकचा भार कमी करणारे जिन्नस आहारात केव्हाही चांगले! 
आठवड्यातील किमान ३० मिनिटे आणि तीन वेळा व्यायामासाठी नियोजित करू शकता.
शक्यतो, दररोज नियमित व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. 
जीवनशैलीत बदल करून देखील गर्भाशयची समस्या असल्यास, तज्ञांच्या सल्ल्याने फर्टिलिटी औषधांचे सेवन करू शकतात. प्रजननासाठी काही निवडक इस्ट्रोजेन रिसेप्टर मॉड्युलेटर औषधे उपलब्ध आहेत.
औषधांचे सेवन करूनदेखील जर गर्भधारणा होत नसेल तर बीजांड सोडण्यासाठी फर्टिलिटी इंजेक्शनची आवश्यकता लागते. फर्टिलिटी इंजेक्शन्समध्ये समप्रमाणात असणारी संप्रेरक,
आपल्या मेंदूला गर्भाशयाला बीजांड बनविण्यासाठी सिग्नल देतात. 
फर्टिलिटी डॉक्टर ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड आणि रक्त चाचण्यांद्वारे या प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवतात. कारण, या चाचण्यांद्वारे त्यांना एस्ट्रॅडिओल पातळीची (अंडाशयात तयार होणारे हार्मोन) नोंद ठेवण्यास मदत होते. मात्र,कधी क़़धी फर्टिलिटी इंजेक्शन्सचा नकारात्मक परिणाम असा होतो की त्यामुळे बहुविध जन्माचा धोका वाढतो.
वर नमूद केलेल्यांपैकी कोणत्याही ट्रीटमेंटनंतर देखील गर्भधारणा झाली नाही तर इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) चा मार्ग अवलंबता येतो. 
 
पी.सी.ओ.एस.साठी आयव्हीएफ उपचार
आय.व्ही.एफ. पद्धतीमध्ये, डॉक्टर किरकोळ प्रक्रियेद्वारे जास्त बीजांडे तयार होण्याची इंजेक्शन देऊन, स्त्रीच्या अंडाशयातील बीजांडे बाहेर काढतात. प्रयोगशाळेत हे बीजांड पिकवले जातात, त्यानंतर यातील चांगल्या प्रतीचे बीजांड गर्भाशयात परत सोडले जातात. या उपचार पद्धतीने गर्भधारणा झाली आहे किंवा नाही हे रक्ताची चाचणी करून ठरवण्यात येते. तसेच, एम्ब्रियो फ्रीजिंग द्वारे भावी योजनेसाठी गर्भ गोठवण्याचा मार्ग देखील यात निवडता येतो.
 
पी.सी.ओ.एस. अनुवांशिक आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी काय करावे? 
सर्वात आधी याची शहानिशा करा, आणि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर उपचार करा. 
 
तुम्हाला पीसीओएस असण्याची शक्यता आहे की नाही हे डॉक्टर ठरवू शकतात. आपला वैद्यकीय इतिहास आणि शारीरिक तपासणीद्वारे ते माहिती काढू शकतात. याव्यतिरिक्त, डॉक्टर आपल्या रक्तातील संप्रेरकांची पातळी तपासण्यासाठी रक्त चाचण्या देखील करतात. तसेच, अंडाशयातील अल्सरसारखी समस्या तपासण्यासाठी स्कॅन घेण्याची शिफारस करतात.
 
तुम्ही पीसीओएस ग्रस्त असल्यास काळजी करू नका. पीसीओएस योग्य पद्धतीने हाताळली जाणारी स्थिती आहे, पीसीओएस ग्रस्त असणाऱ्या बर्‍याच महिलांची गर्भधारणा निरोगी झालेल्या आहेत.
-DR HRISHIKESH PAI

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Hoonemoon Phase लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही 'हनीमून फेज' टिकू शकते का? न्यूरोसायन्सने दिले उत्तर!

Latte Makeup Look फाउंडेशनच्या जाड थराशिवाय मिळवा ग्लोइंग फेस !

पावसाळ्याच्या दिवसांसाठी उत्तम आणि बनवायला खूप सोपी Corn Poha Recipe

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट Korean Cream Cheese Garlic Bread

पुढील लेख
Show comments