Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

What is blepharitis डोळे येणे म्हणजे काय? हा आजार कसा होतो? त्याची लक्षणं काय?

Updated: गुरूवार, 27 जुलै 2023 (22:38 IST)
 
डोळे येणे म्हणजे काय? हा आजार कसा होतो? त्याची लक्षणं काय? त्यावर उपचार कोणते? आणि त्यापासून बचाव कसा करायचा, हे आपण जाणून घेऊया.
 
डोळे येणे म्हणजे काय?
खरं तर हा आजार एक प्रकारचं संसर्ग किंवा अॅलर्जी आहे. ज्या व्हायरसमुळे सहसा आपल्याला सर्दी होते, त्या व्हायरसमुळे हा आजार संभवतो.
बॅक्टेरियल किंवा व्हायरसमुळे डोळे आलेले असल्यास एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो, तर अॅलर्जीमुळे डोळे आलेले असल्यास त्याचा दुसऱ्यांना संसर्ग होत नाही.
 
डोळे येण्याची साथ मोठया प्रमाणात का पसरते?
खरं तर पावसाळ्यात आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे व्हायरस पसरण्याची संधी मिळते.
 
ओलाव्यामुळे संसर्ग बराच काळ शरीरात राहतो. आपल्याला वारंवार घाम येतो आणि यामुळे आपण आपला चेहरा पुसत राहतो. चेहरा पुसताना आपण डोळ्यांनाही हात लावत राहतो.
 
या सर्व कारणांमुळे संसर्ग होतो आणि डोळे येण्याची साथ पसरते.
 
डोळे येण्याची लक्षणं काय आहेत?
डोळे आले असल्यास काही लक्षणं प्रामुख्याने जाणवू लागतात.
 
डोळे हलके लाल होऊ लागतात.
डोळ्यातून पाणी यायला लागतं.
खाज येऊ लागते.
डोळ्यात थोडी चिकटपणा येतो.
डोळ्यात वारंवार खाज येते.
तज्ज्ञ सांगतात की, कधीकधी यासोबत सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणेही जाणवू शकतात.
 
“साधारणपणे असं दिसतं की, डोळे येण्याची लक्षणं एका डोळ्यात आधी दिसू लागतात. मग ती दुसऱ्या डोळ्यामध्येही प्रकट होतात.
 
या जिवाणूचा शरीरातला इंक्यूबेशन पिरियेड म्हणजे, संसर्ग होणे ते लक्षणं दिसण्याचा काळ हा तीन-चार दिवसांचा आहे. पावसाळ्यात व्हायरसच्या वाढीसाठी आणि पसरण्यासाठी पोषक वातावरण असतं. यामुळे पावसाळ्यात या आजाराची साथ जास्त पसरताना दिसते,” अशी माहिती पुण्यातले ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिली.
 
संसर्ग झाल्यास कोणते उपचार असतात?
डोळे आल्यास साधारणपणे दोन आठवड्यांच्या कालावधीत हा आजार बरा होतो. डॉक्टर सांगतात की, हा आजार बरा करण्यासाठी शरिराच्या रोगप्रतिकारक शक्तीला पुरक अशीच औषधं दिली जातात.
 
डॉक्टर डोळ्यात टाकण्यासाठी काही ड्रॅप देतात. तसंच जर ताप किंवा तत्सम काही लक्षणं असतील तर त्यावरही काही औषधं दिली जाऊ शकतात.
 
डॉ. संजय पाटील सांगतात की, या औषधांचा वापर डॉक्टरांच्याच सल्ल्याने आणि त्यांनी सांगितलेल्या प्रमाणातच करणं आवश्यक आहे.
 
ज्यांना संसर्ग झाला आहे त्यांना प्रकाशाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी गॉगल वापरावे, तसंच हात स्वच्छ धुवत राहावेत जेणेकरुन डोळ्यातून आलेला स्त्रावाला हात लागल्याने इतरांना संसर्ग होणार नाही.
 
कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे टाळा. घरात स्वच्छ टॉवेल, रुमाल वापरा.
 
हा आजार फार गंभीर स्वरुपाचा गणला जात नसला तरीही त्याकडे दुर्लक्ष करु नये, असं डॉक्टर सांगतात.
 
“डोळे आल्यावर हा आजार काही दिवसांनी आपोआप बरा होतो. पण काही मोजक्या केसेसमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता असते आणि तो संसर्ग बुबुळांमध्ये जाऊ शकतो. तेव्हा बुबुळांवर पांढरे ठिपके दिसू लागतात असा परिस्थितीमध्ये आजाराचा गंभीरपणा वाढतो.
 
औषधांनी आणि योग्य काळजी घेऊन बुबुळातील संसर्गही दूर होतो. पण त्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे डोळे येण्याची लक्षणं जाणवायला सुरुवात झाल्या झाल्या योग्य औषधोपचार आणि काळजी घेणं गरजेचं आहे,” असं डॉ. संजय पाटील यांनी सांगितलं.
 
संसर्ग होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी?
डॉक्टर सांगतात की, कोणताही संसर्ग जन्य आजारापासून बचाव करण्यासाठी जी काळजी घेणं गरजेचं असतं, ती घेतल्याने या आजारापासून बचाव केला जाऊ शकतो.
 
संसर्ग झालेल्या व्यक्तीने वापरलेले रुमाल, टावेल वापरणं टाळावं
हात स्वच्छ धुवावेत
डोळ्यांना सारखा हात लावू नये

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

स्वातंत्र्यदिनी उठून दिसण्यासाठी अशा प्रकारे करा मेकअप

पाळीच्या काळात पोहणे सुरक्षित आहे का? रक्तस्राव थांबतो की नाही, जाणून घ्या कारण

Deep Amavasya 2026 Wishes in Marathi दीप अमावस्येच्या शुभेच्छा

मुलांमध्ये मत्सर आणि द्वेष वाढण्यामागे काय कारणे आहेत? पालकांनी वेळीच लक्ष द्या

नैतिक कथा : क्षमतेची ओळख; गोष्ट पान आणि मुंगीची

पुढील लेख