Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हार्ट अॅटॅक आल्यानंतर पहिला तास महत्त्वाचा का? त्याला ‘गोल्डन अवर’ का म्हणतात?

Updated: शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (13:03 IST)
 
ते म्हणतात, "हृदयाच्या रक्तवाहिनीत निर्माण झालेला अडथळा पहिल्या तासातच मोकळा करण्यात आला. तर, हार्ट अॅटॅक रिव्हर्स करू शकतो. हृदयाला कायमची इजा होण्यापासून थांबवू शकतो."
 
हृदयाच्या रक्तवाहिन्यात अडथळा निर्माण झाला किंवा रक्तप्रवाह ब्लॉक झाला, तर हार्ट अॅटॅक येतो.
 
नानावटी रुग्णालयाचे कार्डियोलॉजिस्ट डॉ. सुशांत पाटील म्हणतात, "हृदयाला रक्तपुरवठा न झाल्याने हृदयाचे स्नायू 80-90 मिनिटांनी हळूहळू मृत पावण्यास सुरूवात होते. उपचारासाठी उशीर झाला तर हृदयाचे ठोसे अनियमित होतात. स्नायू कुमकुवत होण्यास सुरूवात होते."
 
हार्ट अॅटॅकनंतर उपचाराला उशीर झाला. तर, हृदयाच्या स्नायूंना कायमची इजा होते. हृदय कमकुवत होतं आणि हृदयाची कायमची हानी होते.
 
हृदय कमकुवत झालं तर हार्टफेल झाल्याने कार्डिअॅक अरेस्ट येण्याची शक्यता असते. त्यामुळे हार्ट अॅटॅक आलेल्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी 'गोल्डन अवर' अत्यंत महत्त्वाचा आहे.
 
डॉ. हसनफट्टा पुढे सांगतात, "हार्ट अॅटॅक आलेल्या रुग्णांवर तात्काळ अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली पाहिजे. पहिल्या 15-20 मिनिटात शरीरात तयार झालेल्या गुठळ्या विरघळण्यासाठी औषध दिलं पाहिजे."
 
'गोल्डन अवर'मध्ये नातेवाईकांनी काय करावं?
हृदयरोगाचा झटका आल्यानंतर सर्वात महत्त्वाची भूमिका नातेवाईकांची आणि कुटुंबातील व्यक्तीची असते.
 
डॉ. विवेक महाजन या 'गोल्डन अवर'मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी काय करावं याची माहिती दिली.
 
छातीत दुखू लागल्यानंतर नातेवाईकांनी क्षणाचाही वेळ घालवू नये
तातडीने जवळच्या रुग्णालयात पोहोचून ECG काढावा.
छातीत दुखण्याला अॅसिडीटी समजून घरच्या-घरी उपचार करू नयेत.
डॉ. नईम हसनफट्टा म्हणाले, रुग्णाला तात्काळ अॅस्प्रिनची गोळी चघळण्यासाठी देण्यात यावी आणि डॉक्टरांकडे न्यावं.
 
तज्ज्ञ म्हणतात, छातीत दुखण्याची तीव्रता कमी आहे का जास्त यावर नातेवाईकांनी रुग्णालयात किंवा डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेऊ नये. रुग्णाच्या छातीत अचानक दुखू लागलं तर तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.
 
ही आहेत हार्ट अॅटॅकची लक्षणं
तज्ज्ञ सांगतात, गोल्डन अवरमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हार्ट अॅटॅकची लक्षणं ओळखणं.
 
श्वास घेण्यास त्रास
खूप थकवा येणं
हृदयाचे ठोके अनियमित किंवा खूप जास्त जोरात होणं
अचानक खूप वजन कमी होणं
हार्ट अॅटॅक आल्यानंतर CPR का महत्त्वाचा आहे?
हार्ट अॅटॅक आलेल्या व्यक्तीचं हृदय अचानक बंद पडतं आणि तो व्यक्ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळतो. अशा व्यक्तीला योग्य वेळी CPR दिल्यास जीव वाचू शकतो.
 
वैद्यकीय भाषेत CPR ला कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन म्हणतात.
 
टीव्ही किंवा सोशल मीडियावर तुम्ही अनेक दृष्य पाहिली असतील. ज्यामध्ये हार्ट अटॅकमुळे अचानक बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीच्या छातीवर दोन्ही हातांच्या मदतीने लोक दबाव देतात. या प्रक्रियाला कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन असं म्हटलं जातं.
हृदयरोगतज्ज्ञ म्हणतात, हार्ट अटॅकचे 50 टक्के मृत्यू रुग्णालयात वेळेवर न पोहोचल्याने होतात. कार्डिअॅक अरेस्टमुळे रुग्णांचा मृत्यू होतो. कार्डिअॅक अरेस्ट आलेल्या रुग्णांसाठी CPR अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
 
डॉ. महाजन पुढे सांगतात, "कार्डिअॅक अरेस्ट आलेल्या रुग्णाला CPR वेळेत दिला गेला. तर, लोकांचे प्राण वाचवणं शक्य आहे. रुग्णाला रुग्णालयात हलवताना CPR देण्यात आला पाहिजे."
 
मेंदू आणि शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांना CPR दिल्यामुळे रक्तप्रवाह सुरू रहातो.
 
मधुमेहाच्या रुग्णांना हार्ट अॅटॅक आल्यास काय काळजी घ्यावी?
डायबिटीसग्रस्त रुग्णांना अनेकवेळा हार्ट अॅटॅकची लक्षणं दिसून येत नाहीत. याचं कारण, सामान्यांना हार्ट अॅटॅक येताना दिसून येणारी लक्षणं मधुमेहींमध्ये दिसून येत नाहीत.
 
डॉ. सुशांत पाटील म्हणाले, "मधुमेहामुळे रक्तवाहिन्यांना (नर्व्ह) इजा झालेली असते. त्यामुळे हार्ट अॅटॅक ओळखणं कठीण होतं."
 
मधुमेह आणि हायरिस्क रुग्णांनी ज्यांना श्वास घेण्यासंबंधीचा त्रास असतो. अशा रुग्णांनी रक्तवाहिन्यातील ब्लॉकेज शोधण्यासाठी कॉरोनरी आर्टरीचं (धमनी) सीटी स्कॅन, कार्डिअॅक स्ट्रेस टेस्ट करून घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
 
डॉ. महाजन पुढे सांगतात, "मधुमेहींमध्ये काहीवेळी पोट अचानक मोठं होणं, विकनेस किंवा गरगरण्यासारखी हार्ट अटॅकची लक्षणं दिसून येतात." त्यासाठी मधुमेहानेग्रस्त रुग्णांनी शरीरातील सारखेचं प्रमाण, रक्तदाब आणि इतर महत्त्वाच्या चाचण्या वेळोवेळी करायला हव्यात, तज्ज्ञ म्हणतात.
 
वयोवृद्ध लोक आणि महिलांमध्येही हार्ट अॅटॅकची लक्षणं सारखीच दिसून येत नाहीत. डॉ. नईम पुढे म्हणाले, "याला सायलेंट हार्ट अॅटॅक म्हणतात. जो सहजरित्या ओळखता येत नाही."
 
'गोल्डन अवर'मध्ये रुग्णालयात आल्यामुळे जीव वाचला
मुंबई, पुण्यासारख्या शहरी भागात रुग्णवाहिका चोवीस तास उपलब्ध असतात. पण, दुर्गम आणि ग्रामीण भागात ही परिस्थिती नसते. ग्रामीण भागात अनेकवेळा रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाचा मृत्यू होतो.
 
डॉ. विपीन खडसे जळगावच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात सर्जरी विभागात शिक्षण घेत आहेत. पण, आदिवासी दुर्गम मेळघाटात हार्ट अटॅक आलेल्या एका रुग्णाचा 'गोल्डन अवर'मध्ये रुग्णालयात आल्यामुळे जीव कसा वाचला याची ते माहिती देतात.
 
ते म्हणाले, "मेळघाटात वैद्यकीय सेवा देत असताना एका 70 वर्षाच्या रुग्णाला त्याचे नातेवाईक 60 किलोमीटर लांबून मोटर सायकलवरून रुग्णालयात घेऊन आले. रुग्णाला हार्ट अॅटॅक आला होता. पण, वेळेत रुग्णालयात पोहोचल्याने त्याचा जीव वाचवता आला."
 
या रुग्णाच्या नातेवाईकांनी क्षणाचाही वेळ न घालवता तात्काळ रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतल्याने रुग्णाचा जीव वाचला.
 
डॉ. विपीन यांनी पुढे सांगितलं, "बऱ्याचवेळा ग्रामीण भागातील लोक सुविधा नसल्याने रुग्णालयात पोहोचू शकत नाहीत. रुग्णांना घरीच ठेऊन उपचार करतात. रुग्ण वेळेत रुग्णालयात पोहोचला नसता, तर त्याच्या जीवावर बेतलं असतं."

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Mangalagaur 2026 Wishes in Marathi मंगळागौर शुभेच्छा संदेश

Fasting Fruit Yogurt श्रावणात उपवासाच्या दिवशी थंडगार, पौष्टिक फ्रुट योगर्ट नक्की ट्राय करा

प्रोटीनची कमतरता झाल्यास शरीर देते ‘हे’ संकेत, लक्षणे जाणून घ्या

Bank of Baroda Recruitment : बँक ऑफ बडोदामध्ये २०६ पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

कोपर आणि गुडघे काळे पडले आहेत? काळसरपणा कमी करण्यासाठी करा हे उपाय करा

पुढील लेख
Show comments