गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

त्वचा रोगांचे कारण मळाची आतडी

त्वचा रोग
PR
माणसाचा आहार‍ विहार जसा जसा नकली होत गेला तस तस मलसंचय शरीराच्या पचनमार्गात मोठ्या आड्यात वाढत केला. आज घरोघरी मळबद्धता हा विकार दिसून येत आहे. मळाच्या आतडीतील जमा विकृत मळाचे आक्रमण जेव्हा शरीराच्या त्वचा संस्थानवर होते त्यावेळेस सोर्‍यासिस, एक्झीमा, चेहर्यावर मुरुम, खाज, गजकर्ण, पांढरे डाग, काळे डाग, त्वचा फाटणे, त्वचेवर गाठी येणे, डोक्यात कोंडा होणे असे विकार उद्भवतात. आहारात ज्वारीच्या लाह्या, कण्या, भाकरी, सलाद, भाज्या, पालेभाज्या, आंबट गोड फळे असा आहार मलसंचय होऊ देत नाही व रक्ताला शुद्ध ठेवून योग्य पोषण देतो.

त्वचा रोगांवर रामबाण शोधनचिकित्सा
त्वचा रोगांना समूळ नष्ट करण्यासाठी शोधनचिकित्सा शंभर टक्के गुणकारी आहे. शोधनचिकित्सा प्राकृतिक आहार विहार व पृथ्वी, जल, सूर्यप्रकाश, हवा व आकाशतत्वाची चिकित्सा आहे. या ट्रिटमेंटमध्ये अपयश नाही. शंभर टक्के गुण येतो व तो जन्मभर टिकतो असा अनुभव आहे.

डॉ. सत्यत्रिलोक केसरी