suvichar
✕

अनोश्यापोटी केळ खाऊ नये, असे त्रास होऊ शकतात

Updated: शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 (09:12 IST)
 
* अनोश्यापोटी केळ खाणं पचनासाठी चांगले नाही - 
केळ्यात पोटॅशियम, फायबर आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळतात, परंतु याचा सह हे फळ ऍसिडीक देखील असतं आणि तज्ज्ञ सांगतात की अनोश्यापोटी ऍसिडीक खाद्य पदार्थांचे सेवन केल्यानं पचनाशी निगडित त्रास उद्भवू शकतात. म्हणून अनोश्या पोटी केळ खाऊ नका.
 
* अनोश्यापोटी केळ खाणं हृदयासाठी हानिकारक आहे - 
केळ्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळतात, म्हणून ह्याचे अनोश्यापोटी सेवन केल्यानं रक्तात या दोन्ही घटक चे प्रमाण जास्त होऊ शकतात, जेणे करून आपल्या हृदयाला नुकसान होऊ शकतं. म्हणून अनोश्यापोटी केळ खाण्याचा पूर्वी एकदा विचार करावा.
 
* अनोश्यापोटी केळ खाल्ल्यानं थकवा आणि सुस्ती होऊ शकते -
जर आपण असा विचार करता की केळ खाल्ल्यानं आपल्याला दिवसभरासाठी ऊर्जा मिळेल तर आपण योग्य विचार करता, पण हे अनोश्यापोटी अजिबात खाऊ नये, कारण अनोश्यापोटी केळ खाल्ल्याने आपल्या ला त्वरित ऊर्जा तर मिळेल पण ती तात्पुरती असणार. त्यामुळे आपल्याला लगेच थकवा आणि सुस्ती जाणवणार आणि परत भूक लागेल. त्यामुळे आपल्याला अती खाण्याच्या त्रासाला सामोरी जावं लागणार. म्हणून सकाळी आपण सकाळच्या न्याहारीत केळ्याचा समावेश करावा, पण अनोश्यापोटी अजिबात खाऊ नये. 
 
* रात्री झोपण्याच्या पूर्वी केळ खावं का? - 
बहुतेक लोकं रात्री झोपण्याचा पूर्वी केळ खातात. असे करू नये, कारण रात्रीच्या वेळी केळ खाल्ल्यानं आपण आजारी होऊ शकता. या मुळे आपल्याला खोकला होऊ शकतो.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

दुधाव्यतिरिक्त या ६ देशी पदार्थांमधून मिळवा भरपूर कॅल्शियम; हाडे होतील मजबूत आणि निरोगी!

CA vs CS: चार्टर्ड अकाउंटंट की कंपनी सेक्रेटरी, करिअर म्हणून कोणता कोर्स निवडावा जाणून घ्या

दिवाळी पार्टी असो वा पूजा, तुमचा सणासुदीचा लूक आकर्षक करण्यासाठी या फॅशन टिप्स अवलंबवा

दिवाळीत दम्याचा त्रास वाढू नये म्हणून घ्या विशेष काळजी! फटाक्यांच्या धुरापासून बचावासाठी लक्षात ठेवा या ५ महत्त्वाच्या गोष्टी

साठ दिवसांचा महिना: अकबर आणि बिरबलची गोष्ट

पुढील लेख
Show comments