शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : रविवार, 26 फेब्रुवारी 2023 (00:07 IST)

सायनसचा त्रास असल्यास हे घरगुती उपाय करून बघा

सायनसच्या त्रासाची सुरुवात ऍलर्जी आणि सर्दी पडस्यापासून होते. दिवसात उकाडा तर रात्री गारवा. कधी कडक ऊन तर कधी एकाएकी पाऊस येणं. हवामान बदलूनच राहिले आहे. आजकाल अचानक हवामान बदलत आहे. अश्या परिस्थितीत हंगामी रोग होऊ शकतात. याचा माणसाच्या शरीरावर वाईट परिणाम होतो. बदलत्या हंगामात लोक सर्दी- पडस्याला बळी पडतात. हंगामी रोगास संवेदनशील असणाऱ्या लोकांचा सायनसचा त्रास वाढू लागतो. हा रोग ऍलर्जी आणि सर्दी पडसं या मुळे होतो. बऱ्याच वेळा सायनस आढळून देखील येतं नाही. आणि आपण याला नाक जाम होणं समजतो. 
 
सायनसच्या समस्येमध्ये बहुतेक लोक औषधे, इन्हेलर्स इत्यादी उपचार घेतात. परंतु आपणास माहित आहे का की सायनसच्या समस्येवर घरगुती उपचार देखील प्रभावी असतात. आज आम्ही आपल्याला असेच काही उपाय सांगणार आहोत. संक्रमण, ऍलर्जी, सर्दी-पडसं आणि केमिकल इरिटेशनमुळे सायनस होऊ शकतं. या मुळे बऱ्याच समस्या होऊ शकतात. 
 
चेहरा मध्ये नमी, ताप
कान आणि दातात दुखणं 
नाकाने श्वासोच्छ्वासाच्या समस्या, घसा खवखवणे, 
चेहऱ्यावर सूज येणं.
 
* वाफ घेणे - 
सायनसच्या त्रासात नेहमीच नाकातून पाणी येतं. यासाठी वाफ घेणं फायदेशीर राहत. एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि टॉवेलचा वापर करून तोंड पूर्ण झाकून घ्या. जशी-जशी गरम पाण्याची वाफ नाकात शिरेल आपले बंद असलेले नाक परत उघडणार. वाफ घेतल्यानं आपल्याला आराम मिळेल. आपण या पाण्यात विक्स किंवा पुदिन्याचे पान देखील घालू शकता. 
 
* गरम पेय पदार्थ घेणं - 
सायनसचा त्रास असल्यास गरम पेयांचे सेवन घेतल्यानं बंद नाक उघडते. आयुर्वेदिक चहा किंवा काढा घेतल्यानं फायदा होतो. सायनसचा त्रास असल्यास मद्यपान करणे हानिकारक असू शकतं. 
 
* चेहऱ्यावर गरम टॉवेल ठेवा - 
सायनसच्या त्रासात बहुतेकदा नाक बंद होते. त्यामुळे डोकं जड होतं, अश्या परिस्थितीत टॉवेल भिजवून आपल्या चेहरा झाकून घ्या. असे केल्यानं आपल्याला या त्रासापासून आराम मिळेल.
 
* पुरेशी विश्रांती - 
बऱ्याच काळ बसून काम केल्याने सायनसचा त्रास अधिक वाढतो. सायनसाच्या त्रासापासून त्वरित आराम मिळविण्यासाठी जास्तीत जास्त विश्रांती घ्यावी.