शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Updated : मंगळवार, 21 फेब्रुवारी 2023 (19:42 IST)

Benefits Of Flax Seeds जवसाचे औषधी उपयोग

flax seeds
जवस ही तेल बी पण आहे. जवसाचे तेल स्वयंपाकघरात पदार्थ बनवताना आवश्‍य वापरावे. तसेच हाडाच्या विकारांवर उपयुक्‍त मानली आहे. जवसाची चटणी रोज आपल्या आहारात नियमित समाविष्ट करणे आवश्‍यक आहे. त्याचे औषधी उपयोग असे. 
 
लघवी साफ, दाह कमी होण्यासाठी – लघवी करतेवेळी दाह किंवा आग होत असेल तर जवसाचा काढा द्यावा. हा काढा करण्याची कृती अशी, 12 ग्रॅम जवस व 6 ग्रॅम ज्येष्ठमध घेऊन ते चांगले ठेचून त्याचा 1 लिटर पाण्यात अंदाजे एक अष्टमांश उरेल एवढा काढा करावा. मग त्यात 12 ग्रॅम खडीसाखर घालून दोन चमचे रोज सकाळ संध्याकाळ प्यावे; लघवीची जळजळ कमी होते तसेच लघवीस साफ होते.
दंतरोगावर – हिरड्या मजबूत रहाव्या व दंतदुखीवर उपचार म्हणून जवसाच्या तेलाने मसाज करावा.
कफ पातळ होण्यासाठी – कफयुक्‍त ज्वरात (तापावर) जवसाच्या पिठाचे पोटीस करून छाती शेकली असता कफ पातळ होतो व ताप लगेच उतरतो.
पाठदुखीवर – पोट, पाठ वगैरे ठिकाणी एकसारखे दुखत असेल तर दुखणाऱ्या जागी जवसाचे पोटीस बांधीत जावे.
गळूवर – अंतरविद्रधी म्हणजे आत तोंडाचे गळू झाले असले तरी एकसारखे पुष्कळ दिवस, पोटीस बांधीत गेल्याने ते बाहेर तोंड करून फुटते व आराम वाटतो.
सूजेवर व कोणत्याही जखमेवर – कोणत्याही ठिकाणी मग ती जखम असो, सूज असो, अगर व्रण असो, लाल होऊन ठणका लागला असेल, तर जवसाचे पोटीस बांधावे. पू होऊन जखम फुटून बरे वाटते.
भाजले असता – भाजलेल्या जागी जवसाचे तेल व चुन्याची निवळी एकत्र घोटून त्याची पट्टी दिल्याने भाजलेले लवकर बरे होते.
पचन क्रिया चांगली होण्यासाठी – आहारात जवसाचा वापर करावा ज्यामूळे भूक चांगली लागते व पचनक्रिया चांगली होते.
सुदृढ आरोग्यासाठी – रोज सकाळी अनशेपोटी एक चमचा जवसाचे तेल प्यावे त्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहते. रक्‍तदाब, रक्‍तशर्करा, हृदयाचे ठोके सारेच योग्य आरोग्यपूर्ण होतात. आरोग्याच्या कोणत्याच तक्रारी राहात नाहीत. अशाप्रकारे जवस हे गुणकारी आहे. हिवाळ्यात आपल्या शरीरात उष्णता निर्माण करते.
जमालगोटा – जमालगोटा हा तीव्र रेचक आहे. जेपाळ जमालगोटा या नावाने तो ओळखला जातो. याचे बी व तेल गुणकारी असते. लहान प्रमाणात गुणकारी आहे. मोठ्या मात्रेत विषारी आहे. शरीरातील आप तत्त्व जुलाबावाटे आवाहन केल्यासारखे भरभर बाहेर पडते.
हृदयावरील जल दाब कमी करण्यासाठी – हृदयावरील पाण्याचा दाब कमी करण्यास याचा उपयोग होतो.
मलावरोधात उपयुक्‍त – मलावरोधात जमालगोटा महत्त्वाचे काम करतो. कावीळ झाली असता जमालगोटा काविळीतही देतात.