suvichar
✕

तुमचे BP Low असेल तर काळजी घ्या, ते धोकादायक असू शकते

Updated: बुधवार, 26 एप्रिल 2023 (15:29 IST)
 
* कॅफिन घ्या - 
आरोग्य तज्ज्ञांचा मते, जर आपले रक्तचाप एकाएकी कमी झाले असल्यास, अशा परिस्थितीत आपण चहा किंवा कॉफी किंवा कॅफिन सारखे पेयपदार्थ घ्यावे. हे आपल्या रक्तदाबाला तात्पुरती वाढण्यास मदत करतं. एकाएकी बीपी कमी झाल्यास एक कप कॉफी घेतल्यास आपल्याला निश्चितच आराम मिळेल.
 
* द्रव्य पदार्थ जास्त घेणे - 
आरोग्य तज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ असे सांगतात, की कमी रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी आपल्या आहारात द्रव्य पदार्थांवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्याला दिवसातून किमान 2 ते 3 लीटर पाणी पिणे आवश्यक आहे. या शिवाय आपण नारळ पाणी आणि इतर निरोगी पेय पदार्थ देखील आपल्या आहारात समाविष्ट करावं. हे आपल्या शरीरातील द्रव्य पदार्थाना तसेच बनवून राखण्यासाठी आवश्यक असलेले इलेक्ट्रोलाइट्स देतात. निर्जलीकरण हे कमी रक्तदाब असण्याचे सामान्य कारण आहे.
 
* तुळशीची पाने चावा- 
आहारतज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार ज्या लोकांना कमी रक्तदाब असण्याची म्हणजेच लो बीपी असण्याची तक्रार असते, त्यांनी सकाळी उठून पाच -सात तुळशीची पाने चावून चावून खावी. वास्तविक तुळशीच्या पानांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी उच्च प्रमाणात असते, जे आपल्या रक्तदाबाला नियंत्रित करण्यास मदत करते. हे युजेनॉल नावाच्या अँटीऑक्सीडंटने देखील भरलेले असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि कोलेस्ट्रॉल ची पातळी कमी करते. 
 
* हे उपाय करावे- 
आपणास कमी रक्तदाबाचा त्रास असल्यास हे उपाय आपल्यासाठी खूप प्रभावी आहे. 
आपण अधिक काळ उपाशी राहणे टाळावे. 
दोन आहाराच्या मध्ये पौष्टिक आणि निरोगी स्नॅकिंग घ्यावी. 
एका दिवसात 3 वेळा मोठे आहार घेण्यापेक्षा 5 वेळा लहान लहान आहार घ्या. 
हे आपल्या रक्तदाबाला कमी होण्यास प्रतिबंधित करेल.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

स्तनामध्ये फक्त गाठच नाही, तर हे बदलही असू शकतात धोक्याचे संकेत; वेळीच ओळखा लक्षणे

मान आणि खांदे आखडल्याने त्रस्त आहात का? ही सोपी योगासने दररोज करा

तेनालीराम कहाणी : वृद्ध भिकारी आणि राजा कृष्णदेवरायाची उदारता

हिवाळ्यात तूप गोठते? जाणून घ्या तूप दीर्घकाळ ताजे आणि रवाळ ठेवण्याच्या सोप्या टिप्स!

मराठी भाषेतील हे सुंदर शब्द रोजच्या बोलण्यातून हरवत आहेत का? अर्थासह जाणून घ्या

पुढील लेख
Show comments