Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गाढ झोप येण्यासाठी हे करा

Updated: शुक्रवार, 31 मे 2019 (15:13 IST)
करा योग्य उशीची निवड - चांगली झोप आणि उशी यांचा घनिष्ठ संबंध आहे. उशी गळा आणि डोक्याला आधार देते तसेच पाठीचा मणकाही ताठ ठेवते. जर तुम्ही पोटावर झोपत असाल तर मऊ उशीचा वापर करा. जर एका कुशीवर झोपत असाल तर मध्यम नरम उशीची निवड करा. जर तुम्ही सरळ पाठीवर झोपत असाल तर उशी थोडी कडक असावी.

योग्य आहार - झोपण्यापूर्वी जास्त जेवण करू नये. जास्त जेवल्यास शरीराचे तापमान वाढते आणि झोपही येत नाही. याचा अर्थ असा नव्हे की, तुम्ही कमी जेवण करावे. रात्रीच्या जेवणानंतर केळी खाणे चांगले राहील. केळीत ट्रिपटोफोन नावाचे अँमिनो अँसिड आढळून येते. हे आम्ल शरीरात सेरोटोनिन हार्मोनच्या उत्सर्जनासाठी सहाय्यभूत आहे. ते मेंदू आणि शरीर शांत करते. चहा-कॉफीचे सेवनही कमी करावे.

सप्लिमेंट्स घ्यावे - कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास झोपेची समस्या दूर होते. मॅग्नेशियम नैसर्गिक झोप आणणारे मिनरल मानले जाते. यामुळे तणाव कमी होण्यासही मदत मिळते. स्नायू आणि मेंदूचा तणावही कमी होतो. कॅल्शियमच्या कमतरतेमुळेसुद्धा झोपेची समस्या उद्भवते. दूध, ओट्स आणि अंजीरचे सेवन करावे.

प्रकाश कमी ठेवावा - रात्रीच्या वेळी तीव्र प्रकाश असल्यास झोप येत नाही. खरे तर कमी प्रकाशात मेलाटोनिन नावाच्या हार्मोनचा स्राव होतो. या हार्मोनमुळेच झोप येते. त्यामुळे रात्री झोपताना झिरो लाइट लावावा.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पावसाळ्यात त्वचेचे संक्रमण टाळायचे असेल तर या ५ सोप्या उपायांचा नक्की करा अवलंब!

चहा सोडल्यावर शरीरात होतात ‘हे’ ९ मोठे बदल; जाणून घ्याल तर नक्कीच बसेल धक्का!

बद्धकोष्ठता आणि गॅसने त्रस्त आहात? रोज करा मलासन; पोटाच्या समस्या कमी करण्यास होऊ शकते मदत!

अकबर-बिरबलची कहाणी : पन्नास पडीक जमीन

Ahilyabai Holkar Punyatithi 2026 Vinamra Abhivadan अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

पुढील लेख
Show comments