1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 25 मे 2019 (16:44 IST)

या आठ मार्गाने करा थकवा दूर करा

Stress Relief
सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवत असेल आणि कोणतेही काम करायची इच्छा होत नसेल तर या टिप्स तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत. 
 
सर्वप्रथम तुम्ही भरपूर झोप घ्या. अपुरी झोप झाल्यामुळे चीडचीड होते तसेच जास्त झोपण्याने शरीरात आळस निर्माण होतो.
 
पाण्यात थोडेसे मीठ टाकून अंघोळ केल्याने रक्तपुरवठा सुधारतो आणि शरीराला आराम मिळतो. असे केल्याने ताजेतवाने वाटते.
 
शॉवरखाली अंघोळ करायला आवडत असेल तर त्याखाली उभे राहून थोडा वेळ थंड पाणी अंगावर टाकावे. 
 
जेवणावर तुमच्या शरीराची शक्ती केंद्रीत असते. व्हिटॉमिन बी, मॅग्नेशियम, पोटेशियम आणि लोहयुक्त जेवणाने ताकद वाढते. म्हणून जेवणात अन्न, फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवावे. चॉकलेट, मांस, अल्कोहल व कॅफीनयुक्त पदार्थ खाणे टाळावे.
 
व्यायामामुळे रक्तात एंड्राफिन्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे मन प्रसन्न होते. म्हणून मोकळ्या जागेत नियमित व्यायाम करण्याची सवय लावावी. ताजी हवा व मोकळ्या वातावरणामुळे थकवा दूर होतो.
 
शरीराला मॉलिश केल्यानेसुद्धा आळस दूर होतो.
 
थकवा दूर करण्‍यासाठी तणावमुक्त राहणे गरजेचे आहे. तणावामुळे शरीराची उर्जा संपते व थकवा येतो. हा व्यायाम करून पहा : दीर्घ श्वास घ्या. काही सेकंदापर्यंत श्वास रोखून ठेवा व नंतर सोडून द्या. काही मिनिटे असेच करा. 
 
रंगांचा सुद्धा जीवनावर प्रभाव पडतो. नारंगी, लाल, पिवळा आणि डार्क हिरवा रंग मनाला तजेला देतात. त्यामुळे प्रसन्न वाटते. 
 
थकवा जास्त जाणवत असेल तर वर दिलेल्या टिप्स नक्कीच उपयोगात आणा.