सायंकाळी कॉफी प्यायल्यास होते रात्रीची झोपमोड

Coffee
Last Modified बुधवार, 15 मे 2019 (12:22 IST)
कॉफी पिणे हे स्टेट्स सिम्बॉल समजले जाते. कॉफी प्यायल्याने तरतरी येते. पण, कॉफी प्यायल्याने झोपमोड होत असल्याचे संशोधनात उघड झाले. झोपण्यापूर्वी सहा तास आधी कॉफी प्यायल्यास एक तास झोप कमी होते. रात्री चांगली झोप घ्यायची असल्यास सायंकाळी 5 वाजल्यानंतर कॉफी पिऊ नका, असा सल्ला संशोधकांनी दिला.
झोपण्यापूर्वी तीन ते सहा तास आधी दोन ते तीन कप कॉफी प्यायल्यास 400 मिलीग्रॅम कॅफेन शरीरात जाते. त्यामुळे एक तास झोप कमी होते. मात्र, झोप का उडाली याची निश्चित माहिती त्या व्यक्तीस मिळत नाही. कॅफेनमुळे झोपेचे खोबरे होते अशी शक्यता झोप विषयातील तज्ज्ञांनी व्यक्त केली, असे अमेरिकन अँकॅडमी ऑफ स्लीप मेडिसीनचे अध्यक्ष एम. सफवान बद्र यांनी सांगितले.

या संशोधनासाठी व्यवस्थित झोप घेणार्‍या 12 जणांचा अभ्यास केला. त्यांच्या शारीरिक चाचण्या करून त्यांच्या मुलाखती घेतल्या. या सर्वाना नेहमीच वेळेनुसार झोप घेण्यास सांगितले. त्यांना चार दिवस तीन गोळ्या देण्यात आल्या. या गोळ्या वेगवेगळ्या वेळेस घ्यायच्या होत्या. या गोळ्यांमध्ये कॅफेनचे मिश्रण होते, असे हेन्री फोर्ड झोप संशोधन केंद्रातील संशोधक ख्रिस्तोफर द्राके यांनी सांगितले.
झोपण्यापूर्वी विविध वेळी कॅफेनचे सेवन केल्यानंतर काय होते याचा अभ्यास करण्यात आला. हे संशोधन जर्नल ऑफ क्लिनिकल स्लीप मेडिसीनमध्ये प्रसिद्ध झाले.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

आपणास ही 5 लक्षणे आढळल्यास सूर्यदेवाच्या शरणी जावे

आपणास ही 5 लक्षणे आढळल्यास सूर्यदेवाच्या शरणी जावे
आज आम्ही आपणास सांगणार आहोत अश्या 5 लक्षणांबद्दल जे शरीरात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेला ...

स्मार्टफोनचा अती वापर केल्यानं धोकादायक आजार होऊ शकतात

स्मार्टफोनचा अती वापर केल्यानं धोकादायक आजार होऊ शकतात
स्मार्ट फोनच्या जगात मागील 10 वर्षात मोठा बदल झाला आहे. आज प्रत्येक जण स्मार्टफोन वापरत ...

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक मिळविण्यासाठी फेशियल योगासन

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक मिळविण्यासाठी फेशियल योगासन
शरीराच्या प्रत्येक भागावर लठ्ठपणा वाईटच दिसतो. मग तो चेहर्‍यावरच का नसे. बऱ्याच वेळा काही ...

वाघाबद्दल 10 आश्चर्यकारक तथ्य

वाघाबद्दल 10 आश्चर्यकारक तथ्य
आपल्या पृथ्वीवर अनेक प्राणी आणि वनस्पती आहेत ज्यांची माहिती मुलांना पाहिजे. प्राण्यांचे ...

बारीक दिसायचे आहे मग कपड्यांमध्ये या रंगांचा वापर करा

बारीक दिसायचे आहे मग कपड्यांमध्ये या रंगांचा वापर करा
कपड्यांची खरेदी करताना स्टाईल, वर्क, पॅटर्न असे विविध पैलू पडताळून पाहिले जातात. काही ...