सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 13 मे 2019 (10:06 IST)

तारा सुतारिया म्हणते, हृतिक रोशन 'हॉट' टीचर!

'स्टुडेंट ऑफ द ईअर 2' या चित्रपटातील विद्यार्थिनीच्या भूमिकेत असणारी अभिनेत्री तारा सुतारिया हिने सुप्रसिद्ध हृतिकविषयी तिचे मत मांडले आहे. ती म्हणते की, हृतिक रोशन हा हॉट शिक्षकांपैकी एक आहे. सुपरस्टार हृतिक रोशनने आपल्या अभिनय शैलीने चाहत्यांना नेहमीच भारावून सोडले आहे. एका मुलाखतीत ताराने सांगितले की, मला वाटते की, हृतिक रोशन एक चांगला शिक्षक असून हॉट शिक्षकही आहे. यावरुन असे दिसते की, तारा सुतारिया हृतिकची मोठी चाहती आहे. आगामी चित्रपट 'सुपर 30' यामध्ये हृतिक रोशन गणिताच्या शिक्षकाची भूमिका साकारणार आहे. तो प्रत्येक चित्रपटातील भूमिका चांगली साकारतो. या चित्रपटातील भूमिकाही चांगल्याप्रकारे साकारेल, अशी अपेक्षा आहे. 'सुपर 30' हा चित्रपट 26 जुलैला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांचा आणखी उत्साह वाढला आहे. हा चित्रपट बिहारमधील एका शिक्षकावर आधारित आहे. यांचे नाव आनंद कुमार. यांना गणिताचे जादूगार म्हटले जाते. हे बिहारमध्ये सुपर 30 नावाचा एक प्रोग्रॅम चालवतात. त्यांनी अनेक गरीब आणि हुशार मुलांना कोणतीही फी न घेता आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. ज्या मुलांचीआर्थिक परिस्थिती नाही त्यांचा सर्व खर्च ते स्वतः करतात. या कामात त्यांना आई आणि पत्नीचादेखील सर्पोट आहे. ही कथा आता पडावर दाखविण्यात येणार आहे.