शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मे 2019 (18:05 IST)

आमिर खानने आपल्या मुली ईराच्या 21व्या वाढदिवशी शेअर केला इमोशनल पोस्टसह विशेष फोटो

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी ईरा 21 वर्षाची झाली आहे. आमिरने ईराच्या वाढदिवशी भावनात्मक पोस्ट शेअर केली आहे. आमिरने ईराबरोबर एक जुना फोटो शेअर केला आहे. आमिरने ते फोटो शेअर करताना लिहिले, '21व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ईरा. मला विस्वासच बसत नाही की तू इतक्या लवकर मोठी झाली. तू माझ्यासाठी नेहमी 6 वर्षांचीच राहणार. लव्ह यू.' 
 
हा फोटो खूपच जुना वाटत आहे. फोटोमध्ये आमिरच्या मिशा देखील दिसत आहे. ईरा अलीकडेच आपल्या काही फोटोंमुळे चर्चेत आली होती. इन्स्टाग्रामवर तिने मिशाल कृपलानी नावाच्या एका मुलासह फोटो शेअर केली आहे. असे म्हटले जात आहे की तो मुलगा ईराचा बॉयफ्रेंड आहे. सोशल मीडियावर ईरा-मिशालच्या फोटोबद्दल बऱ्याच गोष्टी केल्या गेल्या. 
 
आमिर खान शेवटी 'ठग्स ऑफ हिदोंस्तान' या चित्रपटात पाहिले गेले होते. ही फिल्म बॉक्स ऑफिसवर काही विशेष प्रदर्शन नाही करू शकली होती. आमिर खानची फिल्म लाल सिंह चढा 2020 मध्ये रिलीज होणार आहे आणि आतापासूनच चर्चेत आहे.