शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 जानेवारी 2019 (14:17 IST)

आता छोट्या पडद्यावर आमिर खानचा चित्रपट

सोमवारी 2018 च्या पूर्वसंध्येला बॉलिवूडचा स्टिर परफेक्शनिस्ट आमिर खानने एक घोषणा केली आहे. त्याने यावेळी आपल्या नव्या प्रोजेक्ट रूबरू रोशनीची घोषणा केली आहे. छोट्या पडद्यावर या चित्रपटाचा प्रोजेक्ट दाखवण्यात येणार आहे. या फीचर चित्रपटाची निर्मिती आमिर खानने पत्नी किरण रावसोबत केली आहे. 26 जानेवारी 2019 रोजी याचा प्रीमिअर होणार आहे. आमिर खानने या अगोदर छोट्या पडद्यावर 'सत्यमेव जयते' हा कार्यक्रम सुरू केला होता. आमिर खानने सांगितले की, मित्रांनो, आमिर खान प्रोडक्शनमधील पुढील चित्रपट 26 जानेवारी सकाळी 11 वाजता स्टारप्लसला दाखवण्यात येणार आहे. किरण आणि मी हा चित्रपट निर्मित केल्याचे आमिर खानने सांगितले आहे. हा चित्रपट आमच्या खूप जवळचा असून 'रूबरू रोशनी' हा चित्रपट पाहायला विसरू नका. आमिर खानच्या 'ठग्स ऑफ  हिंदुस्तान'या चित्रपटाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. आता एक व्हिडिओ आमिर खानने शेअर केला आहे. त्याने ज्यामध्ये सांगितले की, 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी तुम्ही काय करत आहात? म्हणजे मला असे विचारायचे आहे की, झेंडा फडकवल्यानंतर काय करणार आहात? कारण माझ्याकडे तुमच्यासाठी एक योजना आहे.