सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

Health Tips : आपल्या घरी आहे का हे औषधे

घरात नेहमी एक मेडिकल बॉक्स ठेवा, ज्यात हे आवश्यक औषधे असू द्या:



 
* बाम- डोके दुखी, सर्दी-खोकला, हात-पाय आणि कंबर दुखणे या सर्वांवर बाम उपयोगी आहे.
 
* बॅण्ड एड- जखम झाल्यास तिला उघड ठेवल्यास संक्रमण पसरण्याची भीती असते म्हणून घरात नेहमी बॅण्ड एड असू द्या.
 
* एंटीसेप्टिक क्रीम- हात कापला गेला असेल तर आधी डेटॉल ने जखमेला स्वच्छ करून एंटीसेप्टिक क्रीम लावल्याने जखम लवकर बरी होते. याने संक्रमण पसरण्याचा धोका ही टळतो.
 
* एंटासिड- गॅस, आणि अपचन सारख्या तक्रारीरवर एंटासिड औषध उपयोगी पडेल.
* इलेक्ट्रॉल- काही वेळा शरीरात मिठाची व मिनरल्सची कमी होऊन जाते. अशात पाण्यात इलेक्ट्रॉल घोळून पिणे फायदेशीर ठरेल.
 
* थर्मामीटर- घरात थर्मामीटर असणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही चांगल्या कंपनीचा डिजीटल थर्मामीटर नेहमी घरात असू द्या.
 
* एंटी ऍलर्जीक- त्वचेवर होणारी खाज किंवा चट्ट्यांसाठी एंटी ऍलर्जीक औषधे प्रभावी ठरतात.
 
हे सगळे औषधे डब्यात ठेवताना लक्ष असू द्या की त्यांची एक्सपायरी डेट स्पष्ट दिसली पाहिजे. जे औषधे स्ट्रिप कापून ठेवल्या असतीत त्यावर डेटची वेगळी स्लिप लावा.