Daily Horoscope
✕

या प्रकारे वाढवा आपली रोग प्रतिकारकशक्ती

Updated: शुक्रवार, 27 मार्च 2020 (12:57 IST)
 
* रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी चांगली झोप घेणे आवश्यक आहे. रात्री उशिरा पर्यंत जागल्याने आपली प्रतिकारशक्ती कमी होत जाते. मुलांना कमीत कमी 9 तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
 
* बहुतांश आजार अन्नामुळे होतात. खान-पान व्यवस्थित नसल्यास शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते. त्यामुळे साथीच्या रोगांचा धोका वाढवू लागतो. बाहेरचे खाद्य पदार्थ, जॅक फूड, पॅकबंद ठेवलेले पदार्थ, गोड पदार्थांचा जास्त सेवन केल्याने मुलांची रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते.
 
* डॉक्टर नेहमीच सांगतात की काहीही खाण्याचा पूर्वी आपण आपले हात स्वच्छ धुवावेत. मुलांनी काहीही खाण्याचा पूर्वी आपले हात धुऊनच खावे. सर्व जंतू आणि विषाणू हाताच्या माध्यमाने आपल्या शरीरात पोहोचतात. असे होऊ नये हे टाळण्यासाठी आपल्या मुलांना काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्याची चांगली सवय लावा.
 
* ताण तणाव हे माणसाला आतून पोकळ करते. काही पालक अभ्यासासाठी किंवा इतर गोष्टींसाठी मुलांना हुणावतात अशाने त्यांचा मनावर ताण येते आणि ते ताण तणावाचे बळी पडू शकतात. मुलांना कोणत्याही प्रकाराच्या ताणापासून मुक्त ठेवल्यास त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढेल.
 
हार्वर्ड विद्यापीठाचे आधुनिक औषधांवर अभ्यास करणारे डॉ. विलियम ली यांनी काही पदार्थाचे वर्णन केले आहे की मानवातील पाच प्रमुख संरक्षण प्रणाली (रोग प्रतिकारक शक्ती, स्टेम सेल्स, डीएनए, आतड्यामधील चांगले जिवाणू आणि रक्तवाहिन्या) रोगांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी रामबाण उपाय असू शकते. 
 
त्यांचा असं विश्वास आहे की या पाच संरक्षण प्रणाली आपल्या शरीरावर बाह्य होणारे दुष्परिणामांपासून संरक्षण करतात. कोणत्या कारणास्तव ज्यावेळी या संरक्षण प्रणालीवर दबाव येते तेव्हा रोग आपल्यावर आक्रमण करून आपल्याला रोगग्रसित करतो अश्या वेळेस आपण आपल्या सकस आणि चांगल्या आहाराने या संरक्षण प्रणालीस बळकट ठेवू शकतो आणि सुरुवातीच्या काळात कर्करोग होण्यापूर्वी डिमेंशियाला हरवू शकतो.
 
डॉ. ली यांनी 30 वर्षाच्या वैद्यकीय संशोधनानंतर आणि 700 हून अधिक अध्ययनानंतर हे सिद्ध केले आहे.
 
कर्करोग तज्ज्ञ डॉ.सुबीर जैन म्हणतात की संतुलित आहार, नियमित व्यायाम, उच्च प्रथिनेयुक्त आहार, व्हिटॅमिन सी, मल्टी व्हिटॅमिन, मल्टी मिनरल, अमीनो ऍसिड, ओमेगा 3, फॅटी ऍसिड, तसेच प्राणायाम, श्वासोच्छ्वास नियंत्रण, अनुलोम विलोम, भ्रस्तिका, कपाळ भाती या सारखे व्यायाम करून आपण चांगली रोग प्रतिकारक शक्ती मिळवू शकतो.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

दररोज शॅम्पूने केस धुवावेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला आणि योग्य पद्धत

Navratri 2026 : नवरात्रीचा उपवास करताना दिवसभर थकवा येऊ नये म्हणून आहारात काय घ्यावे

नात्यातील प्रेम आणि विश्वास वाढवायचा असेल तर जोडीदाराला दररोज विचारा हे प्रश्न!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत मुलांना सांगता येतील अशा देवीच्या ९ प्रेरणादायी कथा

कामाच्या ठिकाणी चुकूनही सांगू नका 'या' ५ गोष्टी; करिअरवर होऊ शकतो वाईट परिणाम!

पुढील लेख