Marathi Biodata Maker
✕

Almonds For Weight Loss वजन कमी करण्यासाठी बदाम

Updated: सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (15:48 IST)
 
वजन कमी करण्यास बदाम कशाप्रकारे फायद्याचे ? 
बदाम अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे, म्हणून ते एक सुपरफूड मानले जाते. यामध्ये फायबर आणि हेल्दी फॅट्स मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. हे तुमची भूक शांत करते आणि तुम्हाला जास्त खाण्यापासून प्रतिबंधित करते. बदामामध्ये उच्च प्रथिने असतात, जे स्नायू तयार करण्यास मदत करतात. बदामाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल आणि पोटावरील चरबी कमी होऊ शकते.
 
वजन कमी करण्यासाठी बदाम कसे खावे?- 
सकाळी भिजवलेले बदाम खा
वजन कमी करण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाऊ शकता. भिजवलेले बदाम खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होतेच शिवाय इतरही अनेक आरोग्य फायदे मिळतात.
 
बदाम पावडर
वजन कम करण्यासाठी बदाम पावडर डायटमध्ये सामील करु शकतात. बदाम पावडर लापशी किंवा दुधात मिसळून खाऊ शकता. वजन कमी करण्यासाठी त्याचे सेवन फायदेशीर ठरेल. याशिवाय शरीराला पुरेसे पोषण आणि ऊर्जाही मिळेल.
 
शेक किंवा स्मूदी मध्ये मिसळून खावे बदाम
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही बदाम शेक किंवा स्मूदीमध्ये मिसळून खाऊ शकता. हे स्वादिष्ट असण्यासोबतच वजन कमी करण्यातही मदत करू शकते.
 
स्नॅक्स म्हणून बदाम खा
वजन कमी करण्यासाठी तुम्ही स्नॅक म्हणून बदाम देखील खाऊ शकता. बदामामध्ये हेल्दी फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे चयापचय वाढवण्यास मदत करतात. वजन कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.
 
बदामाचे दूध प्या
वजन कमी करण्यासाठी तुम्ही नाश्त्यात बदामाचे दूध पिऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला दुप्पट पोषण मिळेल आणि भूकही नियंत्रणात राहील.
 
वजन कमी करण्यासाठी आपण याप्रकारे बदामाचे सेवन करु शकतात. तथापि जर तुम्हाला कोणत्याही आजार किंवा समस्येचा सामना करावा लागत असेल तर ते सेवन करण्यापूर्वी आरोग्य तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

"कोजागिरी पौर्णिमा शुभ मुहूर्तावर चंद्र देवाला दाखवण्यासाठी नैवेद्य थाळी''

उकडलेली अंडी, ऑम्लेट की भुर्जी? अंडी खाण्याची योग्य पद्धत कोणती, जाणून घ्या फायदे!

LLM Constitutional Law मध्ये करिअरची संधी! पात्रता, अभ्यासक्रम, टॉप कॉलेज, नोकरीच्या संधी आणि पगार जाणून घ्या

दिवाळीत डोळे दिसतील अधिक सुंदर! परफेक्ट आय मेकअप करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

Kojagiri Purnima 2026 Wishes in Marathi कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा

पुढील लेख
Show comments