Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पावसाळ्यात भिजल्यावर या 5 गोष्टी करा, अन्यथा आपण आजारी पडू शकता

Updated: बुधवार, 1 जुलै 2020 (17:19 IST)
 
पावसात भिजल्याने साधारणपणे लोकांना ताप, फ्लू, खोकला आणि चक्कर येणे सारख्या समस्या दिसून येतात. आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे काही असे टिप्स सांगणार आहोत, ज्यास आपण पावसाळ्यात भिजल्यावर अवलंब करून स्वतःला आजारपणापासून वाचवू शकता. 
 
1 पावसाळ्यात भिजल्यावर कपडे बदलावे : 
जर का आपण कोणत्याही कारणास्तव पावसात भिजला असल्यास घरी आल्यावर सर्वात आधी आपले कपडे बदलावे. कारण ओल्या कपड्यांमुळे आपल्याला थंडी लागू शकते. बऱ्याचशा लोकांना या कारणास्तव सर्दी पडसं आणि ऍलर्जी सारख्या समस्या दिसून येतात. कपडे बदलल्याने थंडी लागण्याची शक्यता कमी होईल.
 
2 पावसाळ्यात भिजल्यावर केसांना वाळवून घ्या :
पावसाळ्यात जास्त भिजला असाल तर आपण कोमट पाण्याने अंघोळ करावी. नंतर आपल्या संपूर्ण शरीराला विशेषतः आपल्या केसांना वाळवून घ्यावं जेणे करून आपण आजारी पडू नये. पावसाळ्यात केस ओले झाल्यामुळे डोक्यात संसर्गाचा धोका वाढून जातो. जर आपण आपले केस स्वच्छ धुऊन वाळवाल तर संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. 
 
3 गरम अन्न आणि गरम पेय घेणे : 
पावसाळ्यात थंडावा असतो. सर्वत्र पाणीच पाणी असल्यामुळे या हंगामात व्हायरल आणि बेक्टेरियल संसर्गाचा धोका वाढून जातो. या हंगामात आपण आपल्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. 
 
4 फास्ट फूड आणि तळकट पदार्थांपासून लांब राहावं : 
पावसाळ्यात लोकं घरात असो किंवा बाहेर चहा आणि भजी खावंसं वाटतं. तेच काही लोकं फास्टफूड खाण्यास प्राधान्य देतात. तर या हंगामात बाहेरचे खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने आपले पोट खराब होऊ शकत. जर आपण भिजला आहात तर असे पदार्थ खाणं टाळावं.
 
5 हलके फुलके व्यायाम करावं : 
पावसाळ्यात सर्व लोकांनी हलके फुलके व्यायाम करावे. असे केल्याने आपण तंदुरुस्त राहाल आणि रक्त विसरणं देखील चांगले होईल. आपण बाहेरून भिजून आला आहात तर आपणास ताणण्याचे व्यायाम केले पाहिजे जेणे करून आपल्या शरीरामध्ये उब येईल.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

Happy Raksha Bandhan Images for Brother रक्षाबंधनाच्या भावाला द्या या खास शुभेच्छा

उपवासासाठी एक उत्तम आणि चवदार रेसिपी ''Green Sabudana Vada''

शौचातून रक्त येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका गंभीर आजारांचे लक्षण होऊ शकतात

Power Grid Vacancy : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये २७० शिकाऊ पदांसाठी भरती, अर्ज २५ ऑगस्टपासून सुरू; पात्रता जाणून घ्या

सणासुदीच्या काळात मेकअप करण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

पुढील लेख