Daily Horoscope
✕

मुलांच्या आरोग्यासाठी घातक प्लास्टिकचे साइड इफेक्ट्स जाणून आजचं वापरणे बंद कराल

Updated: शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (17:17 IST)
 
आज सर्वत्र प्लास्टिकचा सर्रास वापर होत आहे. शाळेत मुलांना दिले जाणारे खाण्याचे डबे असो किंवा पाण्याच्या सुंदर आकर्षक बाटल्या असो किंवा कंपास बॉक्स असो. मुलांना भुरळ पाडणारे असतात. पण आपल्याला माहीत आहे का की या मुलांना आपण जे प्लास्टिक वापरण्यासाठी देता ते किती तरी पटीने त्यांच्या आरोग्यास हानिकारक आहे. 
 
प्लास्टिक हे पर्यावरणासाठी तर हानिकारक आहेच परंतु हे सगळ्याच प्राण्यांसाठी देखील हानिकारक आहे. प्लॅस्टिकच्या भांड्यातून जेवल्याने अनेक आजार होण्याची शक्यता नाकारतं येत नाही. 
 
आपण आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी सर्व काही करीत असतो. मुलांच्या उत्तम आहारासाठी पोषक घटक मिळावे या साठी आहार योजना अशी करतो जेणेकरून त्यांची सर्वांगीण वाढ होवो. त्यांचे सर्व हठ्ठ पुरवतो. अश्या वेळी आपण आपल्या मुलांना रंग बेरंगी प्लास्टिकच्या भांड्यातून जेवण देत असतो. ही प्लॅस्टिकची भांडी आपल्या मुलांच्या आरोग्यास हानिकारक असतात. 
 
प्लास्टिक हे नॉन बायोडिग्रेडेबल आहे. प्लॅस्टिकची भांडी बीपीए पासून मुक्त जरी असले तरी ती आपल्या मुलांसाठीच नव्हे तर निसर्गासाठी देखील हानिकारक असतात. कारखान्यात प्लास्टिक तयार करण्याचा वेळी बेंझिन नावाचे मिश्रण हवेत सोडतात. जे घातक असून कॅन्सर सारख्या आजाराला आमंत्रण देतं.  प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या जवळ राहणाऱ्या लोकांना लिम्फोमा आजाराचा धोका होऊ शकतो.
 
प्लॅस्टिकची भांडी उष्णतेमुळे आणि दररोज घासल्यामुळे त्यावरील थर नष्ट होतो. अनेकदा प्लॅस्टिकची भांडी तयार करताना हानिकारक रसायनाचा वापर केला जातो. आणि त्या भांड्यात खाल्ल्याने कॅन्सर, बर्थ डिफेक्ट्स आणि इंपेअर्ड इम्युनिटी सारखे आजार होऊ शकतात. म्हणून प्लास्टिक वापरणे टाळा आणि निसर्गाला वाचवा.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

कांद्याची साले फेकून देऊ नका! केस गळणे कमी करण्यासाठी आणि केस लांब, दाट व चमकदार बनवण्यासाठी असा करा वापर

Happy Dussehra Images 2026 दसरा शुभेच्छा मराठी इमेजेस

Dussehra 2026 Wishes In Marathi दसऱ्याच्या व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

पुढील लेख
Show comments