रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

वेळेवर रोज ब्रेकफास्ट न केल्यास वाढतो लठ्ठपणा

सकाळी ब्रेकफास्ट न करणे, हे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरु शकते, असा इशारा एका नव्या संशोधनात देण्यात आला आहे. ब्रेकफास्ट न करण्याच्या सवयीने शरीराचे अंतर्गत जैविक चक्र तर बिघडतेच, या शिवाय लठ्ठपणा वाढण्यासाठी मदत होते. शरीरासाठी वेळेवर ब्रेकफास्ट महत्त्वाचा असतो. मात्र तो न करण्याच्या सवीयीचा थेट संबंध लठ्ठपणा, टाईप-2 डायबिटीस आणि हृदय रोगाशी संबंधित आहे.
 
इस्त्रायलमधील तेल अविव युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हे महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. संशोधनात असे आढळून आले की ब्रेकफास्ट न केल्याने जैविक चक्राशी संबंधित क्लॉक जीनवर त्याचा गंभीर परिणाम होतो. हाच जीन आरोग्यदायी लोक आणि डायबिटीज पीडित रूग्णांत अन्न खाल्यानंतर ग्लुकोज व इन्सुलिनच्या प्रतिक्रियांना नियंत्रित करतो.
 
डॅनिएल जॅगूबोविच यांनी सांगितले की ब्रेकफास्ट केल्याने क्लॉक जीन सक्रिय होतो आणि ग्लायसेमिकचे नियंत्रण अधिक प्रभावी बनते. सकाळी 9 वाजण्यापूर्वी ब्रेकफास्ट केल्याने मेटाबॉलिज्ममध्ये सुधारणा तर होतेच याशिवाय लठ्ठपणा कमी करण्यास व टाईप 2 डायबिटीज यासारख्या आजरांवर नियंत्रण मिळविणे शक्य होते.