Dharma Sangrah
✕

तुम्ही अनेकदा रात्रीचे जेवण वगळता का? या समस्या उद्भवू शकतात

Updated: रविवार, 30 ऑक्टोबर 2022 (09:35 IST)
 
जर तुम्ही डायटिंग करत असाल तर नक्कीच तुम्ही हलक्या आणि कॅलरी मुक्त पदार्थांकडे लक्ष दिले पाहिजे, परंतु तुम्ही रात्रीचे जेवण वगळू नये कारण यामुळे कमजोरी होऊ शकते. विशेषत: अनेक दिवस सतत रात्रीचे जेवण वगळल्याने त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ लागतो. रात्रीचे जेवण न केल्याने आरोग्याला होणाऱ्या आणखी अनेक हानींबद्दल जाणून घ्या-
 
उर्जा पातळी कमी होण्यास सुरवात होते
तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी ऊर्जावान राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्ता यामध्ये अनेक तासांचे अंतर असते. अशात रात्रीचे जेवण न केल्याने शरीरातील ऊर्जा पातळी कमी होऊ लागते. त्यामुळे तुम्हाला खूप सुस्त आणि थकवा जाणवू लागतो. यासोबतच शरीराला पुरेसे पोषक तत्व न मिळाल्याने अशक्तपणाही येऊ लागतो.
 
झोप अपुरी राहते
तज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी हलके रात्रीचे जेवण घेणे जितके फायदेशीर आहे. रात्रीचे जेवण न करणेही तितकेच हानिकारक आहे. यामुळे तुमची भूक हळूहळू संपू लागते. उलट झोपताना रिकाम्या पोटी गॅस तयार होतो. त्यामुळे तुमची झोप पूर्ण होत नाही आणि आरोग्यावरही परिणाम होऊ लागतो.
 
शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासते
वजन कमी करताना कमी आहारात शरीराला पूर्ण पोषण देणं सर्वात मोठं काम आहे. अशात रात्रीचे जेवण न केल्याने शरीराला पुरेसे पोषण मिळत नसल्याने पोषक तत्वांची कमतरता भासते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

केस गळतीसाठी सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी कोणत्या चाचण्या कराव्यात

बसताना किंवा उठताना पायांची हाडे कटकटतात का? जाणून घ्या ५ प्रमुख कारणे!

कफाचा त्रास कमी करण्यासाठी करा ही २ योगासने; श्वसनास मिळू शकतो आराम!

वेदांचे आशीर्वाद; पौराणिक कथा राजकुमार आणि भिक्षुकाची

रजोनिवृत्तीनंतर महिलांच्या हृदयाचे आरोग्य का धोक्यात येते? समजून घ्या प्रमुख कारणे

पुढील लेख
Show comments