Festival Posters
✕

आरोग्य : व्हिटॅमिन B12 ची कमतरता का निर्माण होते? त्यामुळे काय त्रास होतात?

Updated: बुधवार, 14 डिसेंबर 2022 (17:54 IST)
व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमागे अनेक कारणं आहेत. याची लक्षणं इतरही अनेक आजारांमध्ये दिसत असल्यामुळे डॉक्टरांनाही पटकन त्याचं निदान होत नाही.
 
आपल्याला असं वाटतं की, आपण अतिशय चौरस आणि आरोग्यदायी आहार घेतो. त्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन B12 ची कमतरता जाणवणार नाही. पण तसं नाहीये.
 
आपल्या शरीरात व्हिटॅमिन B12 कसं शोषलं जातं?
जे लोक शाकाहारी आहेत त्यांना अनेकदा शरीरातली व्हिटॅमिन B12 ची कमतरता दूर करण्यासाठी त्याच्या गोळ्या घ्याव्या लागतात. शरीरात व्हिटॅमिन B12 शोषून घेण्याची प्रक्रिया ही अतिशय गुंतागुंतीची आणि अनेक पातळ्यांवर होणारी असते. ही प्रक्रिया आपल्या तोंडामध्ये सुरू होते आणि छोट्या आतड्यात जाऊन संपते. जेव्हा आपण अन्न खातो, तेव्हा आपली लाळ त्यात मिसळते. आपल्या लाळेमध्ये असलेलं R प्रोटीन हे पोटात अन्नासोबत मिसळतं, आपल्या पोटातली अॅसिडमुळे व्हिटॅमिन B12 नष्ट होऊ नये याची काळजी R प्रोटीन घेतं.
पोटाला असलेल्या अस्तरातून B12 शोषून घेण्यासाठी दोन इन्झाइम्स स्रवतात. त्यापैकी एक अन्न आणि B12 वेगळं करतं आणि ते व्हिटॅमिन लाळेतील R प्रोटीनसोबत मिसळायला मदत करतं.
 
दुसऱ्या इन्झाइममुळे हे व्हिटॅमिन B12 शरीरात शोषलं जातं.
 
या व्हिटॅमिन B12 शरीरात शोषले जाण्याचे दोन प्रमुख टप्पे आहेत. यामध्ये इतर अनेक छोट्याछोट्या पायऱ्या असतात आणि इथेच कोठेतरी व्हिटॅमिन B12ची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते.
 
व्हिटॅमिन B12 ची कमतरता का निर्माण होते?
जर पुरेशा प्रमाणात लाळ स्रवत नसेल तर व्हिटॅमिन B12 हे R प्रोटीनसोबत मिसळत नाही. त्यामुळे शरीराची B12 शोषून घेण्याची क्षमता कमी होते.
 
अनेकदा वेगवेगळ्या औषधांमुळे आपलं तोंड कोरडं पडतं, पुरेशा प्रमाणात लाळ स्रवत नाही. ब्लड प्रेशरवरील औषधं तसंच नैराश्यावर उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधं यांमुळे अनेकदा तोंड कोरडं पडतं.
 
पोटामध्ये जर कमी प्रमाणात अॅसिड स्रवत असेल तरी B12 ची कमतरता निर्माण होते. पोटाच्या अल्सरवर उपचारासाठी जी औषधं वापरली जातात, त्यामुळे अॅसिड स्रवण्याचं प्रमाण कमी होतं. व्हिटॅमिन B12 ची कमतरता आणि अल्सरच्या गोळ्यांमध्ये संबंध असल्याचं संशोधकांना आढळून आलं आहे.
वय वाढत जातं, तसं पोटातील अॅसिड स्रवण्याची प्रक्रिया मंदावते.
 
गॅस्ट्रिक सर्जरी, जुनाट सूज, दीर्घकाळ असलेला अॅनिमिया, थकवा अशा कारणांमुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात. स्वादुपिंडात बिघाड हेही व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेचं प्रमुख कारण असतं.
 
टाइप 2 डायबेटिसमध्ये उपचारासाठी वापरलं जाणारं मेटफॉर्मिन B12 कमतरतेसाठी कारणीभूत ठरतं.
 
व्हिटॅमिन B12 ची कमतरता असेल तर...
कंपलीट ब्लड काउंट (CBC) आणि मेटॅबॉलिक पॅनेलसारख्या टेस्टमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता आहे की नाही हे पाहिलं जात नाही.
 
त्यामुळे जर तुम्हाला व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्यासारखी लक्षणं जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यासंबंधीची चाचणी तातडीने करून घ्यायला हवी.
त्यानंतर शरीरात B12 ची किती कमतरता आहे, त्यानुसार पुढच्या उपचारांची दिशा ठरते. जर B12 अत्यंत कमी झालं असेल, तर तुम्हाला ती कमतरता पूर्ण भरून काढण्यासाठी तुम्हाला किमान वर्ष लागू शकतं. अर्थात, त्यासाठी योग्य उपचार घ्यावे लागतात.
 
B12 च्या कमतरतेसाठी मुख्यतः गोळ्या दिल्या जातात. पण जर तीव्रता अधिक असेल तर इंजेक्शनही दिले जातात. डॉक्टर त्यासाठी आवश्यक सल्ला देतात.

Published By- Priya Dixit 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

Mahanavami 2026 Wishes in Marathi महानवमी शुभेच्छा संदेश मराठी

तोंडाला चव आणणाऱ्या उपवासाच्या भाज्या Vrat Special Vegetable Recipes

पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरच्या घरी करा हे सोपे उपाय

पीएचडी अरेबिक मध्ये करिअर बनवा, पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी वापरा हे सोपे घरगुती उपाय

पुढील लेख
Show comments