बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

Weight Loss Dinner Food वजन कमी करण्यासाठी डिनरमध्ये हे पदार्थ खा, स्लिम आणि फिट राहाल

Weight Loss Dinner Food डिनरमध्ये काय खावे आणि काय खाऊ नये
 
आजकाल वजन वाढण्याची समस्या सामान्य आहे. आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी डायटिंग हा प्रकार सुरू केला जातो. खरं म्हणजे योग्य वेळी योग्य आहार घेतल्याने वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवता येतं. असे मानले जाते की रात्री खाल्लेल्या अन्नाचा शरीरावर जास्त परिणाम होतो. कारण ते पचण्यासाठी वेळ मिळत नाही आणि ते  तुमच्या पोटात दीर्घकाळ राहते. त्यामुळे जेव्हा वजन कमी करण्याचा प्रश्न येतो तेव्हा योग्य वेळी योग्य आहार घेणे अत्यंत आवश्यक असते. तसेच तुमची एखादी चूक तुमचे वजन देखील वाढवू शकते. 
 
अनेक वेळा लोक दिवसभर चांगला डाएट फॉलो करतात, पण जेव्हा रात्रीचे जेवण येते तेव्हा ते जंक फूड सारख्या गोष्टींचे सेवन करतात. या प्रकारच्या चुकीचा परिणाम शरीरावरही होताना दिसतो. अशात रात्रीच्या वेळी काय खावे आणि काय खाऊ नये याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. रात्रीचे जेवण नेहमी हलके आणि पोषक असावे.
 
यामुळे तुमचे पोट भरलेले राहतेच पण वजन कमी करण्यातही ते प्रभावी ठरू शकते. त्याच वेळी बहुतेक लोक रात्री काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल संभ्रमात असतात अशात रात्रीच्या वेळी कोणते पदार्थ खाणे जास्त फायदेशीर आहेत हे आम्ही सांगत आहोत.
 
सूप
आहारादरम्यान बहुतेक लोकांना असा प्रश्न पडतो की त्यांनी पोट भरलेले राहण्यासाठी काय खावे. अशात सूप चांगला पयार्य ठरु शकतात. सतत हिरव्या भाज्या खाऊन कंटाळा येत असेल तर भाज्यांचे सूप हा उत्तम पर्याय आहे. सूपमध्ये कार्बोहायड्रेट, खनिजे, पोषण आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. यामुळे शरीराची पचनक्रिया चांगली राहते आणि वजनही नियंत्रणात राहते. लक्षात ठेवा फक्त हिरव्या भाज्यांचे सूप बनवा मात्र त्यात लोणी- चीज यांसारख्या गोष्टी घालणे टाळा.
 
ओट्स
वजन कमी करण्यासाठी ओट्स खूप उपयुक्त आहेत. यातील फायबर आणि प्रथिने शरीर निरोगी बनवण्यात आणि चरबी कमी करण्यात मदत करतात. ओट्समध्ये बीटा-ग्लुकन आढळते जे आतडे स्वच्छ करण्यास आणि खराब कोलेस्ट्रॉल आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी करण्यास मदत करतं. 
 
अंड्याचा पांढरा भाग
तुम्ही मांसाहारी असाल तर डिनरमध्ये अंड्याचा पांढरा भाग खाऊ शकता. उकडलेल्या अंड्याचा फक्त पांढरा भाग प्रथिनांनी युक्त असतो आणि त्यात चरबी कमी असते. अशा परिस्थितीत हेल्दी लो फॅट डाएट हा सर्वोत्तम पर्याय आहे. अंड्याच्या पांढऱ्या भागात पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, बी-12, बी2 आढळते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात येतो आणि डोकेदुखीची समस्या दूर होते.
 
मासे
चरबी कमी करण्यासाठी आणि स्नायू मजबूत करण्यासाठी मासे हा एक चांगला पर्याय आहे. त्यात ओमेगा-3 फॅटी अॅसिड आढळते, जे हृदयासाठी चांगले असते. रात्रीच्या जेवणात मासे खाणे हा उत्तम पर्याय आहे.
 
सांजा
सांजा बहुतेकांना नकोसा वाटतो पण तुम्हाला हवे असल्यास भाज्या आणि मसाल्यांच्या मदतीने तुम्ही ते चवदार बनवू शकता. रात्रीच्या जेवणात हिरव्या भाज्या मिसळून सांजा बनवा. विशेष म्हणजे यात कॅलरीज कमी असतात आणि फायबर, प्रथिने आणि व्हिटॅमिन-बी सारख्या पोषक तत्वांनी भरपूर असतं.
 
ब्राऊन राईस
जर तुम्हाला भात खायची आवड असेल तर व्हाईट ऐवजी ब्राऊन राइस खाऊ शकता. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि चयापचय सुधारते. याशिवाय कॅलरीज कमी असतात, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी ब्राऊन राईसचे सेवन करावे. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे खूप फायदेशीर आहे.