शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: मंगळवार, 17 जानेवारी 2023 (14:22 IST)

Benefites of Bhekasana : दिवसभर तंदुरुस्त आणि सक्रिय राहण्यासाठी प्रभावी भेकासन

बेडकाची मुद्रा फ्रॉग पोझ  म्हणजेच भेकासनाचे अनेक फायदे आहेत. हे आसन केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते. भेकासनाला फ्रॉग पोझ देखील म्हणतात. कारण मंडुकासनाप्रमाणेच भेकासनाच्या अंतिम टप्प्यात शरीराचा आकार बेडकासारखा होतो. हे आसन पोटावर झोपून केले जाते. हे मंडूकासन आणि धनुरासन सारखे आहे. 
 
भेकासन कसे करावे -
सर्वप्रथम पोटावर झोपावे. दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवून श्वास सोडत दोन्ही गुडघे वाकवून पाठीमागे न्या. आता श्वास घेताना, दोन्ही हातांनी पायाच्या बोटांचा वरचा भाग धरा आणि टाच नितंबांवर ठेवा (तुम्ही छाती जितकी उंच कराल तितके हाताने बोटे पकडणे सोपे होईल). सहज श्वास घेऊन काही सेकंद या स्थितीत रहा. त्यानंतर, श्वास सोडताना, पाय सामान्य स्थितीत आणा आणि काही वेळ पोटावर पडून राहा. जेव्हा तुम्ही या आसनाच्या सरावात पारंगत व्हाल, तेव्हा नितंबांवर टाच ठेवण्याऐवजी त्यांना कमरेला लागून, जमिनीच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि हाताच्या बोटांच्या पुढचा भाग तळहातांनी दाबा.
 
भेकासनाचे फायदे- 
1. पोट, कंबरेच्या खालचा भाग आणि नितंबांची चरबी कमी होते.
2. दीर्घ सरावाने सपाट पायांची समस्या दूर होते.
3. स्वादुपिंडावर ताण आल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि इन्सुलिनचा स्रावही नियमित राहतो.
4. संपूर्ण शरीरात स्नायूंची लवचिकता आणि घट्टपणा निर्माण होतो. म्हातारपणातही कंबर लवचिक राहते आणि स्नायू मजबूत राहतात.
5. पाय, घोटे, गुडघे आणि सांधे दुखणे आणि पाठीच्या खालच्या भागातल्या समस्या दूर होतात.
6. हे आसन आध्यात्मिक ऊर्जा जागृत होते.
7. फुफ्फुसांना जास्त ऑक्सिजन मिळतो. श्वासोच्छ्वास चांगल्या प्रकारे चालू लागतो.
 
सावधगिरी: हे आसन गर्भधारणा, खांदा, पाठ किंवा गुडघेदुखीमध्ये प्रतिबंधित आहे. 
 
 हे आसन करण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्यावा.
 
Edited  By - Priya Dixit