शनिवार, 10 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 डिसेंबर 2025 (08:00 IST)

रेस्टॉरंट स्टाइल घरीच बनवा पनीर बटर मसाला रेसिपी

Paneer Butter Masala Recipe
साहित्य-
पनीर- ३०० ग्रॅम  
काजू 
टोमॅटो- ५ मध्यम आकाराचे 
कांदा -१ मोठा 
लसूण पाकळ्या
आले- १ इंच
हिरवी मिरची - १-२
बटर-४ टेबलस्पून
तेल- २ टेबलस्पून
क्रीम - १/४ कप 
कसुरी मेथी- १ टीस्पून
काश्मिरी लाल मिरची पावडर 
धणे पूड- १ टीस्पून
गरम मसाला- १/२ टीस्पून
हळद - १/४ टीस्पून
मीठ चवीप्रमाणे
साखर- १/२ टीस्पून 
पाणी गरजेनुसार
दालचीनी - १ इंच
वेलची- २-३
लवंग- ३-४
काळी मिरी - ५-६
तेजपत्ता- १
कृती -
सर्वात आधी  कढईत १ टेबलस्पून बटर  आणि १ टेबलस्पून तेल गरम करा. आता कांदा, लसूण, आले, हिरवी मिरची घालून २-३ मिनिटे परतून घ्या. टोमॅटो आणि भिजवलेले काजू घाला. आता १/२ टीस्पून मीठ घालून झाकण ठेवून १० मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. आता गार झाल्यावर मिक्सरमध्ये गुळगुळीत पेस्ट करून घ्या. त्याच कढईत २ टेबलस्पून बटर आणि तेल गरम करा. संपूर्ण मसाले (दालचीनी, वेलची, लवंग, तेजपत्ता, काळी मिरी घालून ३० सेकंद परतून घ्या. तयार केलेली टोमॅटो-काजू पेस्ट घाला. आता हळद, काश्मिरी लाल मिरची पावडर, धणेपूड घालून ४-५ मिनिटे तेल सुटेपर्यंत परतून घ्या. १  कप पाणी घाला. चवीला मीठ, साखर, गरम मसाला घाला.
५ मिनिटे उकळू द्या. शेवटी १/४ कप क्रीम घालून मिक्स करा. पनीरचे तुकडे घाला.  
हाताने चुरून घेतलेली कसुरी मेथी आणि बटर वरून घाला. व २ मिनिटे झाकून ठेवा आणि गॅस बंद करा. वरून थोडी क्रीम आणि कोथिंबीर घालून सजवा. तर चला तयार आहे आपले  रेस्टॉरंट स्टाइल घरीच बनवा पनीर बटर मसाला रेसिपी, नान, रोटी सोबत  गरम नक्कीच सर्व्ह करा.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik