बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

घराच्या घरी वैद्य व्हा

काकडी सालीसकट खाल्ल्याने यातून कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए आणि के मिळते. यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते. 
 
सफरचंदाच्या सालीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. हे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल व रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यात मदत करते. 
 
आवळ्यात जीवनसत्त्व सी असते. यामुळे केस दाट चेहरा चमकदार दिसतो. आवळ्याच्या सेवनाने बद्धकोष्टतेपासून सुटका मिळते. पोट साफ राहते आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. 
 
भेंडीमधील आर्यनमुळे रक्तामधील हिमोग्लोबिन वाढते. हे अॅनिमिया दूर करण्यास मदत करते. भेंडीमध्ये हिएट‍किक असते जे महिलांची जास्त रक्तस्त्रावाची समस्या दूर करते. 
 
केळी खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो. शरीरालाला ऊर्जा मिळते. केळ्यातील डाएटटी फायबरमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. 
 
पोट कमी करायचे असल्यास न्याहरीमध्ये ब्राऊन ब्रेड आणि मधाचा वापर करा. ब्रेडवर मध लावून खा. यात कॅलरीज कमी असतात. कोमट दुधात मध घालून प्यायल्यास चरबी कमी होण्यास मदत‍ मिळते. 
 
काळे जिरे मूत्रशुद्धीकारक आहेत. काळे जिरे वायुनाशी असल्याने आतडेही साफ राहते. हे जिरे उत्तेजकही आहेत. तसेच प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. 
 
खोबर्‍याच्या तेलामध्ये कापूर मिसळा. हे तेल कोमट करून डोक्याला मालिश करा. एका तासानंतर डोके धुवून घ्या. कोंड्याची समस्या नष्ट होईल आणि केस मजबूत होतील. 
 
रोज रात्री झोपण्याअगोदर  दुधात थोडीशी कापूर पावडर टाका. कापसाने हे चेहर्‍यावर लावा. पाच मिनिटानंतर चेहरा धुवून घ्या. यामुळे स्किन हेल्दी होईल आण चेहर्‍याची कांती निश्चितच वाढेल.