शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पंगत आणि पार्टी....

पंगत म्हणजे डिसीप्लीन- शिस्त.
पार्टी म्हणजे धांगडधिंगा. 
 
पंगत म्हणजे सहभोजन.
पार्टी म्हणजे स्वभोजन.
 
पंगत म्हणजे बैठक ठोकून जेवावे.
पार्टी म्हणजे उभ्याउभ्यानेच हादडावे.
 
पंगत म्हणजे शारिरीक मानसिक आणि आध्यात्मिक साजशृंगार
पार्टी म्हणजे सामाजिक दिखाऊपणाचा अधिभार.
 
पंगत म्हणजे हवं तेवढं जेवा.
पार्टी म्हणजे हवंतर जेवा.
 
पंगत म्हणजे उदबत्यांचा घमघमाट.
पार्टी म्हणजे बाटल्यांचा खणखणाट.
 
पंगत म्हणजे श्लोक म्हणायची घाई
पार्टी म्हणजे मोठ्या आवाजाची महागाई
 
पंगत म्हणजे एका रेषेत ताटे वाढलेली
पार्टी म्हणजे रांग लावून अन्न घेतलेली
 
पंगत म्हणजे ताटालावू काढलेली रांगोळी
पार्टी म्हणजे रिकाम्या वाट्यांची रोषणाई
 
पंगत म्हणजे मिळते पावती तृप्तीची 
पार्टी म्हणजे गोष्ट कोल्हा करकोच्याची 
कोल्ह्याला बाटलीतून दिलेल्या खीरीची
 
पंगत म्हणजे हर हर महादेवा 
पार्टी म्हणजे डान्सचा जलवा
 
पंगत म्हणजे जय जय रघुवीर समर्थ
पार्टी म्हणजे डीजे नाय तर सगळं व्यर्थ
 
पंगत म्हणजे निकोप स्पर्धा खाण्याची
पार्टी म्हणजे भीती उपाशी राहाण्याची
 
पंगत म्हणजे सत्व रजाची आरास
पार्टी म्हणजे रज तमाची नुसती रास
 
पंगतीमधे यजमानी पाहुण्यांना शोधतात.
तर पार्टीत पाहुणे यजमानांना हुडकतात.
 
पंगत म्हणजे काय काय सांगू !!
पार्टी म्हणजे आणखी काय सांगू ???