1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified रविवार, 5 फेब्रुवारी 2023 (14:13 IST)

रविवार स्पेशल मराठी जोक

joke
शिकून काय कराल 
जज चोराला चोरी का केली जाब विचारत होता 
जज : घराचा मालक असताना चोरी कशी केली?
चोर : साहेब, तुमची नोकरी चांगली आहे, 
आणि तुमचा पगारही चांगला आहे, मग हे सर्व शिकून तुम्ही काय कराल?
**********
व्यायाम करा 
 
 डॉक्टर पेशंटला 
डॉक्टर - हे बघा,
तुम्हाला  तब्येत सुधरायची असेल
तर, तुम्ही व्यायाम केला पाहिजे...
एक काम करा तुम्ही रोज कुठलातरी खेळ खेळायला सुरवात करा...
दामू  - डॉक्टर , मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो...
डॉक्टर - अरे वा... किती वेळ खेळता?
दामू  - जोपर्यंत मोबाइलचं चार्जिंग असतं तोपर्यंत...!!!
 
************************************
नवऱ्याचा नकार 
डॉक्टर - दिपू तुझे तीन दात कसे तुटले ?
दिपू  - बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती.
डॉक्टर - मग खायला नकार द्यायचा होता.
दिपू  - तेच तर केले होते...!
*************************************
 
ज्योतिष आणि बंडू 
ज्योतिषी: बंडूला ,तुझ्या कुंडली मध्ये तर पैसाच पैसा आहे
बंडू : ज्योतिषी काका पण कुंडली 
मधून बैंक अकाउंट मध्ये ट्रांसफ़र कसे करायचे?ते तरी सांगा
 
****************
मराठी जोक-100 टक्के वाचवले 
पेपरमध्ये साड्यांची जाहिरात आली 
एक साडी घ्या व 50% वाचवा
नाम्याने  पेपरच फाडला व 100%वाचवले
 
************
 
पेशंट चा विचित्र आजार 
पेशंट - डॉक्टर, मला एक विचित्र आजार झालायं…
डॉक्टर - काय होतंय तुम्हाला?
पेशंट - मला जेवणानंतर भूक लागत नाही,
सकाळी उठल्यावर झोप लागत नाही,
काम केल्यावर थकवा येतो…!
काय करू ?
डॉक्टर - रोज रात्री उन्हात बसा…!!!
 
Edited By - Priya Dixit