गुरूवार, 23 मार्च 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified रविवार, 5 फेब्रुवारी 2023 (13:07 IST)

letest marathi joke : लेटेस्ट मराठी जोक

जा नांदायला 
आई: बेटा तू केस का कापत नाही?
मुलगा: फॅशन आहे आई
आई: गाढवा तुझ्या ताईला पाहण्यासाठी आलेल्या 
पाहुण्यांचा निरोप आलाय
लहान मुलगी पसंद आहे म्हणून
आता जा नांदायला
 
 
********
ब्रेक नाही का लावायचा 
एक मुलगा सायकलवरुन जाताना एका मुलीला धडकला
मुलगी – बावळट ब्रेक नाही का मारता येत 
ब्रेक नाही का लावायचा 
मुलगा  – अख्खी सायकल मारली
आता ब्रेक वेगळा काढुन मारु का?
 
*********
इथे येण्यासाठी मरावं लागत 
एक मित्र आपल्या पिकनिकसाठी
मित्रांना स्मशानभूमीत घेऊन जातो...
सगळे मित्र - ऐ आम्हाला कुठ घेऊन आलास्?
मित्र - अरे वेडयांनो, “लोक मरतात ” इथं यायला !!!
 
**********************
गीता चे उपदेश 
रमेश सुरेशला सांगत होता की
गेली 20 वर्षे गीताचे उपदेश ऐकतोय...!
नंतर कळलं की
गीता त्याच्या बायकोचं नाव आहे...!!!
************
यमराज (बाईला) - चल, मी तुला न्यायला आलो आहे.
बाई - मला दोन मिनिटे द्या.
यमराज - दोन मिनिटात काय करणार...?
बाई - सोशल मीडियावर स्टेटस टाकते, 'यमलोकाचा प्रवास'!
हे ऐकून यमराज बेशुद्ध झाले...!!!
****************
नीट साबण लावा 
बायको - (बाथरूम मधून लाडिक आवाजात) अहो मी साबण लावलाय
जरा तुमच्या मजबूत हातानी चोळून देता का?
नवरा - आलो... आलो... आलो... आलोच...
(नवरा पेपर वाचता वाचता तडक बाथरूम कडे धाव घेऊन आत घुसतो)
बायको - अहो ह्या बादलीभर कपड्याना साबण लावून ठेवलाय.
नीट रगडून धुवा. मला स्वयंपाकाच काम आहे मी जाते...!!
 
Edited By - Priya Dixit