Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगण्यात आनंद शोधा ....

Updated: मंगळवार, 19 सप्टेंबर 2017 (12:15 IST)
कटू क्षण, भांडणे, हेवेदावे, 
ऑफिसमधील कुरघोडी, 
जोडीदारांबरोबरचे मतभेद, 
अबोला, ईर्षां, स्पर्धा 
हे प्रकर्षांने आठवले आणि 
 
आपण त्यात आपल्या 
जीवनाचा 
अमूल्य काळ घालवला; 
अक्षरश: मातीमोल केला, 
अशी भावना झाली. 
 
त्या वेळेला आपण 
त्या भावनांनी 
आंधळे झालो होतो, 
आज खऱ्या अर्थाने 
डोळे मिटायची 
वेळ आल्यावर 
 
त्या फोलपणामुळे 
डोळे उघडले आहेत, 
असे वाटू लागले.
 
ती भांडणे, वादविवाद वेळीच मिटवले असते तर.........
 
कदाचित आयुष्याला 
वेगळा अर्थ प्राप्त होता.
 
जीवनात अनेकांविषयी 
प्रेमभावना, आवड, 
आदर वाटला, 
पण संकोचाच्या बेडय़ांनी 
ते व्यक्त करणे राहून गेले.
 
गेल्या काही वर्षांत 
‘झप्पी’ देण्याचा 
उदयास आलेला भाव 
हा अधिकाधिक 
जागविला असता तर ...
शब्दाशिवाय 
भावना पोहोचल्या असत्या, 
हेही खरे आहे.
 
पुरुषांच्या आणि 
काही अंशी 
उद्योग-व्यवसायात 
गर्क असलेल्या स्त्रिया 
कुटुंबासाठी पुरेसा वेळ 
काढू शकल्या नाहीत. 
 
मुले मोठी झाली, 
स्वतंत्र झाली, 
त्यांचे बालपण सरले, 
 
पण या बालपणातल्या 
अनेक सुंदर गोष्टींचा 
अनुभव यांना 
मुकावा लागला, 
 
कारण ते त्या वेळेत 
त्यांच्या व्यक्तिमत्त्व 
विकासात गर्क होते.
 
आज मागे वळून 
बघताना वाटतेय.., 
 
मुलांना जवळ 
घ्यायला हवे होते, 
 
त्यांच्या केसांमधून 
हात फिरवायचा 
राहून गेला.., 
 
त्यांना न्हाऊ -खाऊ, 
वेणी-फणी करायचे 
राहून गेले, 
 
त्यांना घोडा 
कधी केला नाही, 
 
आयुष्यभर जबाबदारी अन कर्तव्याचीच ओझी अंगावर घेत आलो, 
 
पण करीअर 
करण्याच्या नादात 
मुलांना कधी 
अंगा खांद्यावर 
घेतले नाही. 
 
त्यांचे कोड-कौतुक 
कधी केले नाही, 
 
पैसा बक्कळ होता पण 
अवास्तव गरजे पोटी 
विनाकारण त्याच्या मागे 
धावत होतो. 
 
आता मुले जवळ नाहीत आणि 
हातही उचलवत नाही.
 
मागे उरलीय फक्त थरथर…..!!!
 
क्षमा करायला शिकायचे राहून गेले, 
 
अपमान गिळून टाकायला शिकायचे राहून गेले. 
 
धबधब्यात भिजायचे 
राहून गेले.., 
 
प्रवाहा विरुद्ध 
पोहायचेही 
राहून गेले.
 
लोक काय म्हणतील, 
हा प्रश्न लाथाडायचे 
राहून गेले. 
 
उन्मुक्त उधळून 
घ्यायचे 
राहून गेले.., 
 
उधाण वारा प्यायचे 
राहून गेले. 
 
नव्या पोतडीत 
हात घालायचा 
प्रयत्न करायचे 
राहून गेले. 
 
पराभवाच्या भीतीला 
ठेंगा दाखवायचे 
राहून गेले. 
 
साध्या - साध्या गोष्टींमध्ये खूप आनंद असतो, 
 
हे मान्य करायचे राहून गेले.
 
लेख संपविताना 
माझे डोळे भरून आले 
 
आणि आरती प्रभूंच्या 
ओळी आठवल्या-
 
‘‘गेले द्यायचे राहूनि; तुझे नक्षत्रांचे देणे ’
 
*अजूनही वेळ गेलेली नाही .... जगण्यात आनंद शोधा .... तक्रारी तर कधीच संपणार नाहीत...
Dr. Sanjay Oak
(Ex- Dean, K. E. M. Hospital, Mumbai)

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

प्रियंका चोप्राने श्रीदेवीच्या जयंतीनिमित्त दिले सरप्राईज; 'एम्प्रेस' या त्यांच्या आत्मचरित्राचे मुखपृष्ठ प्रदर्शित

लोकप्रिय गोपी बहू, जिया मानेक आता 'बिग बॉस २०' च्या घरात एन्ट्री करणार!

लोणावळा, माथेरान की भंडारदरा? पावसाळ्यात कोणतं ठिकाण बेस्ट, जाणून घ्या

६२ वर्षीय गोविंदा यांचे नाव नवीन सह-अभिनेत्री कोमल राणीसोबत जोडले

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर रुग्णालयात दाखल आज अभिनेत्यावर शस्त्रक्रिया होणार

पुढील लेख
Show comments