Festival Posters
✕

मोरपिसे मनातली...

Updated: सोमवार, 5 मार्च 2018 (11:07 IST)
उशीर झाल्यावर आपली पण वाट पाहणारे कोणीतरी असते याची किंमत मला मी 'आई' झाल्यावर कळली.
आज का कोण जाणे आईची खूप आठवण आली दिवा लावताना...
 ये ग जरा वेळ काढून. अधूनमधून यावं मुली ने माहेर पणाला . मी गेल्यावर किंमत कळेल बघ माहेरपणाची. असे नेहमी म्हणायची. कसे तरीच वाटायचे मनाला . आज आई नाही, तिची मायेची हाक नाही. आज माझ्या 'सासरी' गेलेल्या मुलीची  वाट पाहताना जाणवते माझ्या आईचे लेकीच्या भेटीसाठी तळमळणारे हृदय.  
तीच आठवली दिवेलगणी ला. तिचे चेहऱ्यावरचे  करुण पण स्निग्ध भाव. तेच भाव अजूनही एखाद्या मोरपिसासारखे मनाच्या कप्प्यात जपून ठेवले आहेत मी. माझी देवावर श्रद्धा होती पण आई इतकी नव्हती. कधीतरी असे घडले की  मी मनापासून देवापुढे हात जोडले माझ्या मुलींसाठी.
मग कळले आई होणे म्हणजे काय असते..
आपसूकच तिन्हीसांजेला दिवा लावू लागले न विसरता .पण आज ही दिवा लावताना आठवते माझे माहेर. आई चे मनाचे श्लोक , तिची कारुण्याने भरलेल्या स्वरातली करुणाष्टके ,   त्यातच मिसळलेला कुकर च्या शिट्टी चा आवाज , उदबत्ती च्या घमघामाटा बरोबरच  आंबेमोहोर तांदळा चा भात आणि हळद हिंग घालून शिजवलेल्या वरणाचा तोंडाला पाणी सुटणारा वास,
गरम गरम पोळ्यां आणि टॉमेटो च्या कोशिंबीरी चा थाट . तिन्ही सांज म्हणजे डोक्यात पक्का बसलेला हा त्रिवेणी संगम
माझी साधी सोपी 'माहेरा' ची व्याख्या.
खरंच माहेरवाशिणी ...जर माझे मनोगत वाचत असतील तर नक्की भेटून या आपल्या आई ला. एखादा फोन तरी कराच. आई मला म्हणायची तू पक्की आई झालीयस . मुलींशिवाय दुसरे काही तुला सुचतच नाही.मुली ची आई होणं सोपं नाही ग बाई!!  आधी तिची मैत्रीण हो मग तुझी लेक तुझं 'आईपण' सहज स्वीकारेल. 
हो आई .. मी प्रयत्न करतेय. पण अजून ही दिवा लावताना देवी च्या जागी तूच दिसतेस ज्या दिवशी माझ्या मुलींना 'देवीच्या' जागी 'मी' दिसेन ना आई , त्या दिवशी मी समजेन की मीही  तुझ्यासारखे मातृत्व निभावले. 
मंजू काणे

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

सोनिया गांधी आणि गांधी कुटुंबाबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे कंगना रणौतविरुद्ध शिमला येथे FIR दाखल

अधर्माचा अतिरेक झाल्यावर पुन्हा अवतरणार भगवान श्रीकृष्ण! 'महाभारत: एक धर्मयुद्ध'च्या दुसऱ्या पर्वाचा ट्रेलर प्रदर्शित

एकता कपूरच्या 'हीरो की हॉरॉरोइन' या हॉरर चित्रपटाचे थरारक पोस्टर प्रदर्शित

बर्फ, समुद्रकिनारे की शाही राजवाडे? तुमच्या हनिमूनसाठी निवडा भारतातील टॉप रोमँटिक ठिकाणे

आजारपणातून बरे झाल्यानंतर अमिताभ बच्चन केबीसी १८ च्या सेटवर परतले, शोचे नवीन भाग १६ नोव्हेंबरपासून प्रसारित

पुढील लेख
Show comments