Marathi Biodata Maker
✕

बालकथा : शापित राजपुत्र

Updated: मंगळवार, 30 जुलै 2024 (08:55 IST)
राजा म्हणाला, 'मूल होण्यासाठी मी काय हवे ते करीन.' मग साधू म्हणाला, 'तुम्हाला दोन मुलगे लवकरच होतील, पण ते दहा वर्षांचे झाल्यावर तुम्ही मला दिले पाहिजेत.' राजाने विचार केला की, दहा वर्षे म्हणजे पुष्कळ अवकाश आहे आणि त्याने साधूला दहा वर्षांनी मुलगे देण्याचे वचन दिले.

साधूने सांगितल्याप्रमाणे राजाला जुळे मुलगे झाले. मुलगे देखणे आणि हुशार होते. दहा वर्षे केव्हा निघून गेली ते राजा-राणीला कळलेही नाही. आणि एक दिवस तो साधू राजवाड्यात आला आणि मुलगे मागू मागला. राजाने मुलगे देण्याचे नाकारले, पण साधूने मायेच्या बळाने त्यांना खेचून नेले. त्याने मुलांना रानात नेले. त्याने थोरल्या मुलाला राजाची शिकवण दिली आणि धाकट्याला जादूगाराची.

इकडे राजा-राणी मुलांना शोधत हिंडू लागले. योगायोगाने त्यांना धाकटा मुलगा नदीच्या काठी आढळला. राजा-राणीने त्याला 'तू आमच्या बरोबर चल' असे म्हटले. मुलाच्या मनातसुध्दा त्यांच्याबरोबर जायचे होते, पण साधूने त्यांच्यावर कडक नजर ठेवली होती. त्याच्या नजरेतून राजा-राणी आणि मुलांची ही भेट सुटली नाही. तो अतिशय संतापला. त्याने त्यांना शिव्या देऊन हाकलून लावले. पण आता दुसर्‍या मुलाच्या मनात आपण नामांकित जादूगर होण्यापेक्षा मोठा राजा व्हावे ही आकांक्षा दृढ झाली. त्याला ती स्वस्थ बसू देईना. तेव्हा एका रात्री त्याने घोड्याचे रूप घेतले आणि तिथून पळ काढला. तो आपल्या राज्यात परत आला. तो राजा-राणीला म्हणाला, 'आई-बाबा, मी काय सांगतो ते नीट ऐका. माझा लगाम कधी कुणाला देऊ नका.'

दुसर्‍या दिवशी राजा-राणी थोरल्या राजकुमाराला एका राजाकडे विकायला घेऊन गेले. राजाने पाचशे सुवर्णमुद्रा देऊन घोडा खरेदी केला, पण राजा-राणीने लगाम मात्र त्या राजाला द्यायचे नाकारले. रात्री राजकुमार आपल्या आई-वडिलांकडे परत आला. त्यांना पैसे मिळाले आणि घोडादेखील मिळाला.

तो साधू मुलाच्या शोधातच होता. त्याला घोड्याबद्दल कळले. तो राजा-राणीकडे गेला आणि त्याला पाचशे सुवर्ण मोहरा देऊन तो लगाम मागितला. त्यांनी लगाम साधूला दिला. तो घेऊन साधू निघून गेला. घोड्याला सारे कळले. मग लगामाच्या मालकाच्या मागोमाग त्याला जाणेच प्राप्त होते. त्याला घेऊन साधू नदीवर गेला. त्याच्या मनात तिथे स्नान करायचे होते. नदीवर गेल्यावर घोड्याने माशाचे रूप घेतले आणि पाण्यात उडी घेतली. साधूने तो मासा पकडला. इतक्यात एका घारीने झडप घालून तो मासा उचलून नेला. त्याबरोबर साधू ससाणा होऊन घारीच्या मागे लागला. तेव्हा घारीने भयाने तो मासा खाली टाकून दिला.

तो मासा सुदैवाने एका राजकन्येच्या बागेत पडला. राजकन्या खिडकीत बसली होती. त्या माशाचा राजपुत्र झाला. राजपुत्राने आपली सारी कथा तिला सांगितली. राजपुत्राचे रूप पाहून आणि त्याची कहाणी ऐकून राजकन्येचे त्याच्यावर प्रेम बसले. तिने त्याच्याशी लग्न केले. त्यानंतर तो राजपुत्र मोत्यांची माळ झाला. राजकन्या सदैव ती माळ आपल्या गळय़ात घालून असायची.

साधू एक दिवस त्या राजवाड्यात आला आणि त्याने तर्‍हेतर्‍हेचे डोंबार्‍याचे आणि जादूचे प्रयोग करून दाखवतो असे राजाला सांगितले. राजाने मांडव घातला. खेळ बघायला लोकांची गर्दी जमली. खेळ खरोखरीच अप्रतिम झाले. ते पाहून राजा संतुष्ट झाला आणि त्याने साधूला 'तुला काय हवे?' असे विचारले. साधू म्हणाला, 'राजा, तुझी मुलगी जी मोत्यांची माळ घालते ती मला दे.' राजकन्येने माळ देण्याचे नाकारले, पण मागाहून वडिलांनी सांगितले तेव्हा तिने ती माळ जमिनीवर टाकली. त्याबरोबर माळ तुटली आणि मोती विखुरले.

मोती विखुरल्यावर साधूने कोंबड्याचे रूप घेतले आणि तो एक मोती गिळणार इतक्यात त्या मोत्यांनी मांजराचे रूप घेऊन कोंबड्यावर झडप घालून त्याला ठार केले. त्याबरोबर तो राजपुत्र आपल्या खर्‍या स्वरूपात प्रगट झाला. तेव्हा सर्व लोकांना फार आनंद झाला. त्यांनी त्याचे प्रेमाने स्वागत केले.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

पौराणिक कथा : माता दुर्गेची कथा

साखरपुड्यासाठी साडी निवडताय? हे पर्याय नक्की पहा! Saree Options Engagement

Paneer Manchurian Recipe लज्जतदार चायनीज पद्धतीची डिश ''पनीर मंचुरियन''

Popular Marathi Boy Names मुलांची २५ लोकप्रिय मराठी नावे

Healthy Dining Options रेस्टॉरंटमध्ये खाऊनही वजन नियंत्रणात ठेवा; हे ७ पर्याय ठरतील उत्तम!

पुढील लेख
Show comments