संबंधित माहिती
- हरिद्वारमध्ये कावड मार्गावरील मशिदी-मजार कापडाने झाकल्या, वादाला तोंड फुटताच निर्देश मागे
- कांवड घेऊन ताजमहालमध्ये पोहोचली महिला, पोलिसांनी अडवल्यावर म्हणाली - 'हे शिव मंदिर आहे, मला भोलेनाथने बोलावले'
- Health Problems वास्तु दोषामुळे हे 4 आजार होऊ शकतात, मुक्तीसाठी घरगुती उपाय
- शर्वरी एक प्रमुख फिटनेस गर्ल आहे, अल्फा शूटच्या आधी बीचवर धावून ट्रेनिंग केली!
- शिवसेना युबीटी नेत्याच्या मुलाचा रिक्षा चालकाशी वादानंतर संशयास्पद मृत्यू
फुलपाखरूं!
छान किती दिसते। फुलपाखरूं
या वेलीवर। फुलांबरोबर
गोड किती हसतें। फुलपाखरूं
पंख चिमुकलें। निळेजांभळे
हालवुनी झुलतें। फुलपाखरूं
डोळे बरिक। करिती लुकलुक
गोल मणी जणुं ते। फुलपाखरूं
मी धरूं जाता। येई न हाता
दूरच तें उडते। फुलपाखरूं
कवी– ग. ह. पाटील
