suvichar

कशात आहे परम आनंद?

रूजलेल्या बीमधून अंकुर वर आला. त्याने हातांची ओंजळ करत सूर्यदेवाला प्रकाशाचे दान मागितले. ते रोपटे हिरवेपणाने तरारले. त्याला घुमारे फुटू लागले. आभाळाने त्याला पाऊसपाणी पाजले. मातीने खाद्य दिले. वार्‍याने गोंजारले. पाखरांनी अंगाईगीते म्हटली आणि त्या रोपाला कळी आली. हळूहळू तिचे फुलात रूपांतर झाले. पण ते फूल सर्वांच्या उपकाराच्या ओझ्याने वाकून गेले.
त्याच्यावरील दवबिंदूंना पाहून वार्‍याने म्हटले, का रडतोस? फूल म्हणाले, सर्वांनी वाढवलं. पण मी कोणाला काही दिलं नाही याचं दु:ख होतंय. वारा म्हणाला, कशाला रडतोस? देण्याचं ज्याला वेड लागलंय त्यानं रडायचं नसतं. तुझा सुवास जगभर उधळून टाक. मध भुंग्यांना दे. तुझा मकरंद खाऊन जग तृप्त होईल. तुझ्याजवळ देण्यासारखं खूप आहे. तू फक्त संकल्प कर. देणं हेच आत्म्याचं लेणं.
 
तात्पर्य: सर्वस्व देण्यातच अंतरात्म्याचा आनंद आहे.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

छोले बनवण्यासाठी कोणते मसाले वापरावेत? व ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी टिप्स लक्षात घ्या

तुम्ही आई-वडिलांपासून दूर राहता का? मग अशा प्रकारे त्यांची काळजी घ्या, कधीही एकटेपणा जाणवणार नाही

प्रत्येकाला आवडतील अशा ५ वेगवेगळ्या कढीच्या पाककृती

पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन कमी करू शकतात हे ५ पदार्थ , विज्ञान काय सांगते ते जाणून घ्या

बाजारात मिळते अगदी तशी आंबट, गोड, तिखट आणि क्रीमी 'दही पुरी' घरच्या घरी बनवा

पुढील लेख
Show comments