Daily Horoscope
✕

तेनालीराम कहाणी : मृत्युदंड

Updated: शनिवार, 25 ऑक्टोबर 2025 (19:59 IST)
 
आता कनक राजू राजाच्या हत्येची योजनेचा विचार करून आपल्या मित्राच्या म्हणजेच तेनालीरामच्या घरी जातो. आपल्या मित्राला अचानक बऱ्याच वर्षानंतर आपल्या कडे आलेलं बघून तेनालीला आनंद होतो. तो त्याचे स्वागत करतो. तसेच काही दिवस कनकराजू त्याच्या कडे थांबतो आणि एकदा तेनालीराम कामानिमित्त बाहेर गेला असताना कनकराजू महाराजांकडे तेनालीच्या नावाने निरोप पाठवतो की आपण या क्षणी माझ्या घराकडे आला तर मी आपल्याला एक अद्भुत वस्तू दाखवेन.असा निरोप मिळाल्यावर राजा कृष्णदेव तेनालीच्या घराकडे जायला निघतात. तेनालीरामकडेच जायचे आहे म्हणून ते निःशस्त्र जातात आणि आपल्या अंगरक्षकांना देखील बाहेरच थांबण्यासाठी सांगतात. आत गेल्यावर कनकराजू त्यांच्यावर हल्ला करतो. राजा कृष्णदेव राय सावध असतात आणि ते कनकराजूचा  वार थांबवतात ,आपल्या अंगरक्षकांना त्याला बंदिस्त बनवायला सांगतात आणि त्याला मृत्युदंडाची शिक्षा देतात. 
ALSO READ: तेनालीराम कहाणी : जादूगरचा अहंकार
आता राजा कृष्णदेव राय चा नियम होता की राजावर जीवघेणा हल्ला करणाऱ्याला जो आश्रय देतो त्याला देखील मृत्युदंड देणार .म्हणून तेनालीरामला देखील मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. तेनालीराम राजा कडून केलेल्या कृत्याची माफी मागत त्यांना माफ करण्याची विनवणी करतात परंतु राजा त्याला सांगतात -" की मी तुझ्यासाठी देखील माझे नियम मोडणार नाही. सांग तुला कसे मृत्यू दंड पाहिजे. हा निर्णय तूच ठरव. "
राजाचे एवढे म्हणणे होते की तेनालीराम लगेच म्हणाले की ''महाराज मला म्हतारपणीचा मृत्युदंड पाहिजे. " हे ऐकून सर्व आश्चर्य करतात. राजा कृष्णदेव राय देखील तेनालीरामच्या चातुर्याला चकित होतात आणि त्यांनी तेनालीची प्रशंसा करतात.  
ALSO READ: तेनालीराम कहाणी : सिंह पकडला गेला
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: तेनालीराम कहाणी : काहीही नाही

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Friend Crush प्रेम नाही, तरीही त्या व्यक्तीची ओढ! तरुणाईमध्ये सध्या चर्चेत असलेला 'फ्रेंड क्रश' ट्रेंड नेमका काय आहे?

काळाकुट्ट आणि चिकट झालेला तवा करा मिनिटांत चकाचक! लिंबू आणि मीठाची भन्नाट ट्रिक

चेहऱ्यावर हवाय झटपट नॅचरल ग्लो? स्वयंपाकघरातील 'या' २ पदार्थांपासून बनवा घरगुती फेसपॅक

चपातीला तूप लावून खाणं फायदेशीर की घातक? वेटलॉससाठी तूप खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत जाणून घ्या

कार्तिकी एकादशीनिमित्त खास नैवेद्याच्या पारंपारिक पाककृती Kartiki Ekadashi Naivedyam

पुढील लेख
Show comments